Friday, December 19, 2025

Buy now

spot_img

किंग कोहलीचा धमाका! ठोकले सलग दुसरे शतक! ; मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडचेही पहिले वन डे शतक!

रायपूर : रांची वनडे सामन्यात शतकी खेळी केल्यानंतर विराट कोहलीने पुन्हा एकदा शतकी धमाका केला आहे. रायपूर वनडे सामन्यात विराट कोहलीने सलग दुसरं शतक ठोकलं. त्याच्या या शतकीमुळे टीम इंडिया मजबूत स्थितीत पोहोचली आहे. विराट कोहलीने वनडेतील 53 वे आणि आंतरराष्ट्रीय 84 वे शतक ठोकलं आहे.

विराट कोहलीने 90 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 100 धावा पूर्ण केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 111.11 चा होता. विराट कोहलीने तिसऱ्या विकेटसाठी ऋतुराज गायकवाडसोबत 195 धावांची भागीदारी केली. त्यामुळे टीम इंडियाला 250 पार धावा करता आल्या. विराट कोहलीने आता सलग दोन किंवा अधिक वनडे डावांमध्ये 11 वेगवेगळ्या शतकांच्या मालिका ठोकल्या आहेत. त्यानंतर एबी डिव्हिलियर्सचा क्रमांक लागतो. त्याने सहा शतके ठोकली आहेत. विराट कोहलीने 83 चेंडूत 12 चौकार आणि 2 षटकार मारत 105 धावा केल्या. विराट कोहलीने रायपूर वनडेमध्ये षटकार मारून आपले खाते उघडले, विराट कोहलीने षटकार मारून वनडे सामन्यात आपले खाते उघडण्याची ही पहिलीच वेळ आहे. सहसा विराट कोहली एकेरी, दुहेरी किंवा चौकारांनी आपले खाते उघडतो.

विराट कोहलीने शतकासोबत न्यूझीलंडच्या केन विल्यमसनच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. या दोघांनी दक्षिण अफ्रिकेविरूद्ध वनडेत तीन शतकं ठोकली आहेत. वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये कोलकात्यात दक्षिण अफ्रिकेविरुद्ध नाबाद 1-0, रांची वनडे 2025 सामन्यात 135 आणि रायपूर वनडे 2025 सामन्यात 105 धावा केल्या.

 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles