Saturday, December 20, 2025

Buy now

spot_img

सावंतवाडीत आयआयटी व मेडिकल अकॅडेमीची सुरुवात! ; भोंसले इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी–बारावी विज्ञान तसेच JEE–NEET–CET प्रशिक्षण सुरु.

सावंतवाडी : येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या अंतर्गत आयआयटी व मेडिकल अकॅडमीची सुरूवात करण्यात आली असून यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना अकरावी-बारावी सायन्स शाखेसह जेईई, नीट, सीईटी यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांची तयारी स्थानिक पातळीवरच करण्यास मदत होणार असल्याचे भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले यानी सांगितले.

यासाठी कोटा व हैद्राबाद येथील नामांकित कोचिंग संस्थांमध्ये कार्यरत, अनुभवसंपन्न शिक्षकवर्ग नियुक्त करण्यात आला असून प्रभावी अध्यापन, अत्याधुनिक कॉम्प्युटर व सायन्स लॅब, मॅथ्स लॅब, नियमित टेस्ट सिरीज, वैयक्तिक मेंटॉरिंग आदी सुविधांवर इथे भर दिला जाणार आहे. ते म्हणाले की आतापर्यंत अशा दर्जाचे प्रशिक्षण मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना मुंबई, पुणे, कोल्हापूरसारख्या शहरांकडे जावे लागत होते; मात्र आता वेळ, पैसा व प्रवासाची बचत होऊन सावंतवाडीमध्येच उत्कृष्ट पर्याय उपलब्ध होणार आहे. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल सुविधेचीही योजना करण्यात आली आहे.

याच कार्यक्रमाच्या निमित्ताने आज दहावीतील विद्यार्थी व पालकांसाठी मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये आयआयटी-जेईई, नीट, करिअर संधी, प्रवेश प्रक्रिया व अभ्यास पद्धती याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शैक्षणिक वर्ष २०२६–२७ करिता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून अकरावी-बारावी सायन्स शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अच्युत सावंतभोसले यांनी केले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles