नागपूर : महाराष्ट्र विधिमंडळ नागपूर हिवाळी अधिवेशन 2025’च्या पूर्वसंध्येला आयोजित चहापान कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

(सर्व फोटो- अनिकेत जामसंडेकर)
राज्यातील विविध विभागांचे मंत्री, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत संवाद साधण्याची संधी मिळाली.
आगामी अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळावा, विकासकामांना गती मिळावी यासाठी सकारात्मक चर्चांची देवाणघेवाण झाली. राज्याच्या प्रगतीसाठी एकसंघपणे आणि निर्धाराने पुढे जाण्याचा दृढ संकल्प केला असून तो पूर्ण नक्कीच करू, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नामदार नितेश राणे यांनी व्यक्त केले.


