वेंगुर्ला : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ग्रामपंचायत अणसुर व सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग (शाखा – वेंगुर्ला) यांच्या संयुक्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ३६ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
यावेळी या शिबिराचे उदघाटन अणसुर सरपंच सत्यविजय गावडे,ग्रामपंचायत अधिकारी श्रीम.सायली सातोसे,सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानचे विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर,उपसरपंच श्रीम.वैभवी मालवणकर,ग्रामपंचायत सदस्य प्रज्ञा गावडे,सुधाकर गावडे, श्रीम.सीमा गावडे,देवस्थान समितीचे अध्यक्ष चंद्रकांत गावडे,एस एस पी एम लाईफ टाईम हॉस्पिटल रक्तापेढीचे मनीष यादव,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील गावडे,पत्रकार दीपेश परब,नितीन अणसुरकर,मंगेश गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलननाने व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.
यावेळी सरपंच सत्यविजय गावडे,ग्रामपंचायत अधिकारी श्रीम.सातोसे मॅडम,उपसरपंच श्रीम मालवणकर मॅडम आदींनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानचे विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर यांनी अणसुर ग्रामपंचायतचे असे स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल कौतुक केले.तसेच सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग ही जिल्ह्यातील रक्तदान,अवयवदान व देहदान या तिन्हि क्षेत्रात काम करणारी एकमेव संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून जगातील दुर्मिळ अशा बॉम्बे ब्लड ग्रुप या रक्तगटाच्या शोध मोहिमेत यशस्वी झालेली एकमेव संस्था आहे.या संस्थेने जिल्ह्यातील सहयोगी संस्थांना सोबत घेऊन रक्तदान चळवळीत आपला जिल्हा स्वयंपूर्ण बनविण्यासाठी मोठे योगदान दिले आहे.
हे शिबीर यशस्वी होण्यासाठी सोनू गावडे, अन्नपूर्णा गावडे, प्रभाकर गावडे, चेतन गावडे, ओंकार गावडे आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचालन व आभार संजय पिळणकर यांनी केले.


