बांदा : बांदा येथील वीज वितरण सहाय्यक अभियंता श्री. ठाकूर यांच्यावर तात्काळ एखाद्याच्या जीवितास जाणीवपूर्वक धोका निर्माण केल्या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करणेबाबत माहिती अधिकार पदाधिकारी तथा राष्ट्रीय मानवाधिकार आयोग सिंधुदुर्ग जिल्हा प्रतिनिधी सुशील चौगुले यांच्याकडून तक्रार दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान आपल्या तक्रारीत सुशिल चौगुले म्हणतात की, मी सविनय तक्रार अर्ज सादर करतो की, उपरोक्त विषयात आपले लक्ष वेधण्यास येत आहे की, माहे ऑगस्ट 2025 महिन्याच्या मध्यान्हात गाव मौजे मडुरा – देऊळवाडी, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग या ठिकाणातून वीज वितरण कार्यालय बांदा. सहाय्यक अभियंता, श्री. ठाकूर यांनी बेकायदेशीररित्या सदर गाव ग्रामपंचायत यांची कोणतीही परवानगी न घेता, बेकायदेशीर अनधिकृतरित्या सदर गावात 11,000 व्होल्टस् विद्युत वाहीनी ही गाव मौजे मडुरा, देऊळवाडी या ठिकाणी असलेल्या M.G.V. मोटार गॅरेजच्या समोरील रस्त्या पलिकडील सार्वजनिक बांधकाम अखत्यारीत रस्ता मडुरा, सातोसे ते सातार्डा रस्ता क्र. 63 या रस्त्याच्या पलिकडील बाजूतून घातलेली होती.
मात्र सदर घातलेली पक्के काँक्रीटीकरण केलेली सदर विद्युतवाहिनी ही त्याच गावातील काही राजकीय व्यक्तींशी सहाय्यक अभियंता श्री. ठाकूर वीज वितरण कार्यालय बांदा यांनी आर्थिक हातमिळवणी करुन सदर गॅरेज मालक श्री. प्रितेश गवंडी यांना नाहक जाणुनबुजून त्रास देण्यासाठी सदर घातलेली 11,000 व्होल्टस् विद्युत वाहीनी ही गॅस कटरच्या सहाय्याने कट करुन दि. 11.11.2025 रोजी सदर गॅरेज पत्राशेडच्या व वॉशिंग सेंटरच्या वरुन घातली. सदर वेळी गॅरेज मालक श्री. प्रितेश गवंडी यांनी सदर कामास कायदेशीर विरोध करण्याच्या हेतूने दि. 11.11.2025 रोजी आपल्या पोलीस ठाणे बांदा यांच्याशी संपर्क करुन तात्काळ सदर बेकायदेशीर काम थांबविणेची तोंडी तक्रार वजा विनंती ही सदर दिवशी आपले पोलीस ठाणे बांदा या ठिकाणी ठाणे अंमलदार म्हणून कर्तव्यावर हजर असणाऱ्या श्रीम. धर्णे यांच्याशी केली. मात्र नेहमीप्रमाणे श्रीम. धर्णे यांनी त्यांच्या कर्तव्य पालनातील कसुर करण्याच्या अंगीकृत गुणांमुळे सदर तक्रार गांभिर्याने घेतली नाही व तक्रारदार यांस चुकीचे बेकायदेशीर मार्गदर्शन करुन तक्रारदार यांची दिशाभुल केली. तसेच सदर बाब ही आपल्या अंतर्गत तसेच अखत्यारीत येत नसल्याचे (धमकी देणे, जिवीतास धोका निर्माण करणे, इत्यादी) सांगितले. त्यामुळे सदर सर्वसामान्य अर्जदार यांनी सदर विद्युत वाहीनीच्या बेकायदेशीर कामास कायदेशीर आवाहन नंतर देता येईल या हेतूने सदर विद्युत वाहीनी घालण्याच्या कामात विरोध दर्शविला नाही.
[10:00 AM, 12/10/2025] महाराष्ट्र माझा: 11,000 व्होल्टस् एवधा उभ्य विद्युत प्रवाह वाहन क्षमतेची असल्याकारणाने व सदर ठिकाणातील पत्राच्या गॅरेज रोड व वॉशिंग सेंटरच्या वरुन गेल्याने वॉशिंग सेंटरच्या स्प्रे-गन चे पाणी हे सदर ठिकाणी गाण्या घुताना सदर विद्युत वाहीनीवर पडून सदर ठिकाणी अपघात होऊन सदर गैरेज मालक श्री. प्रितेश गवंडी व त्यांच्याकडील असलेल्या 3 गरीब कामगारांचा जीव जाऊ शकती. तसेच कायमस्वरूपी अपंगत्य येऊ शकते. सदर बाबतीत विद्युत वाहीनी घालतेवेळी सहाय्यक अभियंता, श्री. ठाकूर यांस विचारणा केली असता, श्री. ठाकूर यांनी श्री. प्रितेश गवंडी यांच्या घरात घुसून श्री. ठाकूर यांनी श्री. प्रितेश गवंडी मांस सदर विद्युत वाहीनी विरोध बंद कर अन्यथा तुझ्या घराचा तसेच गॅरेजचा विद्युत प्रवाह खंडीत करीन. तसेच इथेच तुला मारुन टाकीन. असे सांगून शिवीगाळ केली व गुन्हेगारी धमकी दिली.
सदर बाबतीत माझी आपणास विनंती आहे की, सदर बाब ही बेकायदेशीर असून तात्काळ सदर बीज वितरण कार्यालय बांदा सहाय्यक अभियंता श्री. ठाकूर यांच्यावर B.N.S. कलम 106 एखाद्याच्या जिवीतास जाणीवपूर्वक घोका निर्माण करणे, B.N.S. कलम 351 गुन्हेगारी स्वरुपाची धमकी देणे. B.N.S. कलम 356 बदनामी करणे, B.N.S. कलम 223 लोकसेवकाने योग्यरित्या जाहीर केलेल्या शासन आदेशाची अवहेलना करणे, B.N.S. कलम 289 तांत्रिक व यंत्राच्या संदर्भात निष्काळजीपणा केल्यामुळे एखाद्याच्या जिवीतास धोका निर्माण होणे या अनुसार आपल्या पोलीस ठाणे बांदा या ठिकाणी श्री. ठाकूर यांच्यावर तात्काळ F.I.R. दाखल करुन प्रथम खबरीची प्रत्त ही शासन निर्णय क्र. एम. आय.एस. 2016/ प्र.क्र. 97/ पोल. 11 गृहविभाग महाराष्ट्र शासन, मंत्रालय मुंबई या शासन निर्णया अन्वये तसेच शासन निर्णय क्र. संकीर्ण-1010/ प्र.क्र. 126/2010/18 (र.व.का) मंत्रालय मुंबई 400032, सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन या शासन निर्णयान्वये 7 दिवसात मला अवगत करावी ही विनंती. तसेच सदर बाबतीत सह पोलीस निरीक्षक, बांदा पोलीस ठाणे म्हणून आपणाकडून कर्तव्य पालनात तसेच F.I.R. दाखल करणे संदर्भात कोणतीही कर्तव्य कसूर निदर्शनास आल्यास आपणास कोणतीही पुर्वकल्पना न देता तात्काळ आपली तक्रार ही वरिष्ठ पोलीस प्राधिकरणाकडे करण्यात येईल व त्यानंतर उद्भवणाऱ्या सर्व कायदे विषयक बाबींसाठी सदर कार्यालयाचे कार्यालय प्रमुख म्हणून सर्वस्वी आपण जबाबदार असाल, असेही श्री. चौगुले यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.


