सावंतवाडी : धारगळ येथील आयुर्वेदिक संस्थांनाच्या माध्यमातून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय ओपीडी सुरू करण्याचा फक्त प्रस्ताव देण्यात आला आहे. मात्र अद्यापपर्यंत कोणतीही अधिकृत मंजुरी मिळालेली नाही, असे असताना आमदार दीपक केसरकर व त्यांच्या सहका-यांनी ओपीडी सुरू झाल्या सारखे वातावरण करून आपली पाठ थोपटून घेण्याचा प्रकार केला आहे, अशी टीका ठाकरे शिवसेनेचे प्रवक्ते आशिष सुभेदार यांनी केली आहे.
या ठिकाणी प्रस्ताव दिला आहे. अद्यापपर्यंत मंजुरी मिळाली नाही. दिल्ली येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर ती परवानगी मिळणार आहे. त्यामुळे फिजिशियन दिल्यासारखी फसवणूक होऊ नये, असाही टोला सुभेदार यांनी लगावला आहे.
धारगळ येथील आयुष मंत्रालयाच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात ओपीडी सुरू करण्यासाठी स्थानिक स्तरावर मंजुरी घेण्यात आली आहे.या पार्श्वभूमीवर त्यासाठी आवश्यक असलेले डॉक्टर कर्मचारी नेमण्याची व ओपीडी सुरू करण्याबाबत परवानगीसाठी हा प्रस्ताव दिल्ली येथील कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे
मात्र अद्याप पर्यंत कोणतीही मंजुरी मिळाली नसताना त्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर व त्यांच्या सहकायांनी मंजुरी मिळाल्यासारखेच श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु चौकशीअंती अद्यापपर्यंत मंजुरी मिळाली नाही तर तसा प्रस्ताव पाठवला आहे, असे धारगळ येथील हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे हा सर्व प्रकार म्हणजे लोकांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा सारखा आहे .
यापूर्वी सुद्धा दीपक केसरकर यांनी सावंतवाडी रुग्णालयात फिजिशियन देतो, नेमणूक दिली असे सांगून लोकांची दिशाभूल केली आहे, असे निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केले होते. मात्र प्रत्यक्षात तो फिजिशियन त्या ठिकाणी हजर झाला नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे असाच प्रकार या ओपीडी बाबत होऊ नये, त्यामुळे स्वतःची पाठ थोपटून घेण्यापेक्षा येथील लोकांना चांगले सेवा देण्यासाठी प्रयत्न करा!, असा सल्ला श्री. सुभेदार यांनी दिला आहे.
स्वतःची पाठ थोपटून घेण्यासारखा ‘तो’ प्रकार हास्यास्पद! ; सावंतवाडीत धारगळ येथील आयुर्वेद संस्थानाच्या ओपीडीबाबतच्या श्रेय वादावरून ठाकरे गटाचे आशिष सुभेदार यांचे टीकास्त्र.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


