सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा बँक हे जिल्ह्यातील शेतकरी मच्छिमार सर्वसामान्य नागरिक यांची बँक आहे. यावर जिल्ह्यातील सहकारी संस्था पतसंस्था व शेतकरी अवलंबून आहेत. या सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या नेतृत्वाखाली बँकेचे संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे ही बँक राज्यात व देशात सर्वोत्कृष्ट बनवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत त्यामुळे सिंधुदुर्ग बँकेचे वैयक्तिक स्वार्थासाठी कोणी नुकसान करू नये, चर्चेतून मार्ग निघू शकतो अशी प्रतिक्रिया आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केली आहे.
आमदार निलेश राणे यांनी फेसबुक व ट्विटर ब्लॉकवर आपली प्रतिक्रिया जाहीर केली आहे
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे हे आपल्या संचालक मंडळासह शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला सहकार क्षेत्रात सर्वोत्तम बनविण्यासाठी सातत्याने काम करत आहेत. ही बँक गेली अनेक वर्षे आपल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे राज्यात अव्वल राहिली आहे. राज्यस्थरावरील विविध पूरस्कार हे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेने मिळवले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी, शेती पूरक संस्था, सहकारी संस्था यांच्या हिताच्या दृष्टीने जिल्हा बँक कार्यरत आहे.
पुढे आम निलेश राणे यांनी आता सगळं चांगलं चालू असताना महायुतीमध्ये चांगलं वातावरण राहो यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. वैयक्तिक अजेंडा यामध्ये येता कामा नये, बसून चर्चेमधून मार्ग निघू शकतो पण टीका करायची काही गरज नाही. असेही म्हटले आहे.


