सावंतवाडी: नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी प्राचार्य किरण वेटे सर यांनी विद्यालयातील आठवीतील शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी निमिष उमेश राऊळ, साक्षी मोहन दळवी तसेच वेटलिप्टींग मध्ये विभागस्तरावर निवड झाल्याबद्दल रोहन रामचंद्र गावडे व आदित्य आनंद राऊळ व पॉवरलिफ्टिंग मध्ये हार्दिक परशराम धोंड याची विभागस्तरावर निवड झाल्याबद्दल किरण वेटे यांनी यशप्राप्त विद्यार्थ्यांना फाईल देऊन विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी तुम्ही विविध स्पर्धेत यश मिळवून प्रमाणपत्रांनी ही फाईल भरली पाहिजेत, असे उद्गार काढले.
माजी प्राचार्य किरण वेटे यांनी गणित विषयाचे उत्कृष्ट अध्यापन करून गणित व शिष्यवृत्तीचा तसेच एनएमएमएस परीक्षेचा निकाल चांगला लावलेला आहे. नेमळे पंचक्रोशीतील अनेक माजी विद्यार्थी त्यांचेकडे आदर भावनेतून पाहतात.
शाळेबद्दल, विद्यार्थ्यांबद्दल त्यांच्याठिकाणी आज ही आपुलकी व दातृत्वाचे गुण असून दरवर्षी ते शाळेसाठी व विद्यार्थ्यांसाठी आर्थिक व भेटवस्तूच्या स्वरूपात नेहमीच सहकार्य करतात. यावेळी प्राचार्य आर. के राठोड, अनिल कांबळे, उमेश राऊळ, पांडुरंग दळवी, सगुण नेमण, दिलीप मेस्री उपस्थित होते


