Friday, December 19, 2025

Buy now

spot_img

दुसऱ्या सम्यक संबोधी साहित्य संमेलनाची रूपरेषा जाहीर!, कवि विठ्ठल कदम यांच्या अध्यक्षतेखाली होणार निमंत्रितांचे कवी संमेलन. : २० रोजी कणकवलीत आयोजन. ; पुरस्कार आणि स्पर्धा पारितोषिक वितरण, निमंत्रितांचे कविसंमेलन.

कणकवली : सिंधुदुर्ग सम्यक संबोधी संस्थेतर्फे दुसरे सम्यक संबोधी साहित्य संमेलन शनिवार 20 डिसेंबर रोजी दुपारी ३ वा. सुप्रसिद्ध कवी अजय कांडर यांच्या अध्यक्षतेखाली येथील नगर वाचनालयाच्या सभागृह आयोजित करण्यात आले आहे. त्याची रूपरेषा जाहीर करण्यात आली असून काव्य पुरस्कार तसेच सम्यक संबोधी साहित्य संस्थेने आयोजित केलेल्या कविता व कथा स्पर्धेचे पारितोषिक वितरण त्याचबरोबर निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष किशोर कदम, कार्यवाह सूर्यकांत साळुंके यांनी दिली.

सामाजिक कार्यकर्ते तथा अस्तित्व प्रतिष्ठान मुंबईचे अध्यक्ष विनय विलास साळुंके हे संमेलनाचे उद्घघाटक म्हणून उपस्थित राहणार असून यावेळी प्रमुख उपस्थित म्हणून सिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
संमेलनात संस्थेचा दरवर्षी देण्यात येणारा सम्यक संबोधी काव्य पुरस्कार वाई येथील कवयित्री डॉ. योगिता राजकर यांना त्यांच्या ‘ बाईपण’ या काव्यसंग्रहासाठी प्रदान करण्यात येणार आहे. तर याचवेळी संस्थेने आयोजित केलेल्या कथा आणि काव्य स्पर्धेतील बाबुराव बागुल कथा पुरस्कार इचलकरंजी येथील कथाकार महावीर कांबळे यांना तर गोलपिठा काव्य पुरस्कार ओरोस येथील कवयित्री विद्या पाटील यांना देऊन गौरविण्यात येणार आहे.

कवी विठ्ठल कदम यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले असून या कवी संमेलनात पुढील कवींचे काव्यवाचन होणार आहे – प्रा.नामदेव गवळी, प्रा.मोहन कुंभार, डॉ . सई लळीत, प्रा.श्वेतल परब, ऋतुजा सावंत भोसले, नीलम यादव, सिद्धार्थ तांबे, संजय तांबे, प्रज्ञा मातोंडकर, प्रिया पारकर, किशोर वालावलकर, सागर कदम, हरिचंद्र भिसे, रामचंद्र शिरोडकर, माधव गावकर, निशिगंधा गावकर, निकेत पावसकर, पी.एल.कदम, संगीता पाटील, सत्यवान साटम, प्रा नंदकुमार हेदुळकर, पल्लवी शिरगावकर, आर्या बागवे, सुधीर गोठणकर, चेतन बोडेकर, माधव गावकर, ॲड.मेघना सावंत, संचिता चव्हाण, ॲड.अर्चना गव्हाणकर, अस्मि जोईल, सायली नारकर, अमर पवार, श्रवण वाळवे, प्रगती पाताडे, रीमा भोसले, सुरज खंडारे, रचना रेडकर, तानाजी भोसले, संदीप कदम, विजयकुमार शिंदे, शशिकांत तांबे, आर्या कदम, नरेंद्रकुमार चव्हाण, सुरेश पवार, मनोहर सरमळकर.
तरी साहित्य रसिकांनी संमेलनात सहभागी व्हावे असे आवाहन श्री कदम आणि श्री साळुंके यांनी केले असून अधिक माहितीसाठी संपर्क – मो.नंबर – 9422963655

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles