सावंतवाडी : मळेवाड ते आजगाव सावरदेव वतसेच मळेवाड जंक्शन येथील रस्त्याचे डांबरीकरण काही दिवसांपूर्वी करण्यात आले होते मात्र काही दिवसातच या रस्त्यावरील डांबरीकरण, खडीकरण केलेला रस्ता खराब होऊन रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले होते.

त्यामुळे या रस्त्यावर वाहने घसरून अपघात घडण्याचे प्रकार वाढले होते.
या घटनेबाबत वारंवार आवाज उठवण्यात आला होता. तसेच’सत्यार्थ महाराष्ट्र न्यूज’ने देखील वारंवार याबाबत वृत्त प्रसारित केले होते.
त्यामुळे संबंधित विभागाने ,ठेकदाराने याबाबत तात्काळ दखल घेत या रस्त्यावर पडलेले खड्डे दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू झाल्याने वाहनचालक, ग्रामस्थानी समाधान व्यक्त केले आहे.


