Friday, December 19, 2025

Buy now

spot_img

अनधिकृत LED मासेमारी करणाऱ्या तीन नौकांवर मत्स्यव्यवसाय विभागाची कारवाई!

रायगड : महाराष्ट्र राज्याच्या सागरी हद्दीत अनधिकृत LED व्दारे मासेमारी करणाऱ्या रायगड जिल्हयातील 02 मासेमारी नौकांवर दिनांक 17.12.2025 रोजी व दिनांक 18.12.2025 रोजी रात्राी 02:10 वाजता मत्स्यव्यवसाय विभागाकडून गस्ती नौकेव्दारे कारवाई करण्यात आली. श्री. जगन्नाथ माया कोळी, रा. राममंदीर केळवणे, ता. पनवेल यांच्या मालकीच्या साई गणेश क्र. IND-MH-7-MM-1318 ही नौका दिनांक 17.12.2025 रोजी खदेरीच्या समोरील समुद्रात रात्री 09:30 वाजता 10 वावात अनधिकृत LED पध्दतीने मासेमारी करीता असताना मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्ती नौकेद्वारे पकडण्यात आली. तसेच दि.17.12.25 रोजी रात्री 11.00 वाजता अलिबाग समोरील समुद्रात 12 वावात मासेमारी करीत असताना श्री. यशवंत गणपत नाखवा रा.साखरकोळीवाडा पो.आक्षी ता.अलिबाग जि.रायगड यांच्या मालकीची हेरंब कृपा IND-MH-3-MM-4194 ही नौका अनिधकृत एलएईडी पध्दतीने मासेमारी करीत असताना मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्ती नौकेद्वारे पकडण्यात आली.तसेच दि.18.12.25 रोजी सकाळी 6 वाजता श्री.प्रकाश तुकाराम पाटील रा.करंजा ता.उरण जि.रायगड यांची मासेमारीनौका श्रीसमर्थ कृपा क्रं.IND-MH-7-MM-3627 या नौकेची विभागाच्या गस्तीनौकेवरून तपासणी केली असता सदर नौकेत 1) 4000 वॅटचे अंडर वॉटर एलएईडीचे लाईटचे चार नग २) 3000 वॅटचे अंडर वॉटर एलएईडीचे लाईटचे तीन नग 3) 2500 वॅटचे अंडर वॉटर एलएईडीचे लाईटचे एक नग 4) सीया लाईट 1000 वॅटचे 16 नग ५) चारशे वॅटचे 2 नग हॅलोजन बल्ब ६) एक जनरेटर असे अनिधकृत एलएईडी मासेमारी करण्याचे साहित्य पकडण्यात आले आहे.

उपरोक्त प्रमाणे तीनही अनधिकृतपणे एलएईडी मासेमारीनौका मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दहाड सत्रात पकडण्यात आल्या असून सदरच्या मासेमारी नौका व त्यावरील साहित्य जप्त करण्यात आले आहे. सदरचे कारवाई श्री. महेश देवरे सहआयुक्त सागरी, श्री नागनाथ भादुले, प्रादेशिक उपायुक्त मत्स्यव्यवसाय मुंबई, परवाना अधिकारी ससून गोदी, परवाना अधिकारी करंजा, परवाना अधिकारी मिरकरवाडा रत्नागिरी व परवान अधिकारी साखरीनाटे रत्नागिरी यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles