
सावंतवाडी : भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पुरस्कृत, तसेच विनोद राऊळ यांच्या संकल्पनेतून श्री देव मालोबा वॉरियर्स ग्रुप, कलंबिस्त, राऊळवाडी आयोजित भव्य ‘एक गाव एक संघ’ या क्रिकेट स्पर्धेची दिमाखात सुरवात झाली. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोसले, आंबोली मंडल अध्यक्ष संतोष राऊळ, जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगांवकर, अनिल निरवडेकर, कलंबिस्त सरपंच सौ. सपना सावंत, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गौरव जाधव, माजी जि. प. सदस्य पंढरी राऊळ, बाबुराव कविटकर, सांगेली सरपंच लवू भिंगारे, कलंबिस्त उपसरपंच सुरेश पास्ते, युवा मोर्चा अध्यक्ष निलेश पास्ते, बूथ अध्यक्ष नामदेव पास्ते, कृष्णा राऊळ, अतोन, ग्रा. सदस्य सौ. रिया सावंत, माडखोल उपसरपंच भाऊ कोळमेकर, गेळे सरपंच सागर ढोकरे, मेघा तावडे, मुख्याध्यापक अभिजीत जाधव, रविकमल सावंत, महेश सावंत, शरद नाईक, किशोर नाईक, सुभाष राऊळ, सगुण पास्ते, अशोक राऊळ, विनेश तावडे, संदीप राऊळ, राजेश पास्ते, विजय पास्ते आदी ग्रामस्थ उपस्थित होते.



