जगात खळबळ! – डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा टाकला टॅरिफ बॉम्ब! ; ‘या’ ८ देशांवर लादला मोठा कर.

वाशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला टॅरिफ धोरणाने हादरवून सोडले आहे.भारतावर देखील ट्रम्प यांनी ५० टक्क्यांहून अधिक टॅरिफ लावले आहे. आता ट्रम्प यांनी पुन्हा एकदा टॅरिफ बॉम्बचा धमाका केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी ग्रीनलँडच्या नियंत्रण करण्याच्या अमेरिकेच्या भूमिकेला विरोध करणाऱ्या आठ युरोपीय देशांना १० टक्के टॅरिफ लावण्याची धमकी दिली आहे. जर हे देश बधले नाही तर १ जूननंतर हा टॅरिफ २५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात येईल असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.

‘या’ आठ देशांना हादरा –

डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपच्या आठ देशांवर टॅरिफची कुऱ्हाड चालविली आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशल पोस्ट टाकत ही घोषणा केली आहे. त्यात त्यांनी १ फेब्रुवारीपासून डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड्स, फिनलँड आणि ब्रिटेनमधून आयात होणाऱ्या सामानावर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ लावला जाईल असे म्हटले आहे. त्यानंतर १ जूनपासून या टॅरिफमध्ये २५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात येईल असेही त्यांनी म्हटले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles