Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

उद्या होणाऱ्या आंदोलनात शिक्षण क्षेत्राशी निगडीत सर्व घटकांनी सहभागी व्हावे..स्वेच्छेने सहभागी होणाऱ्या घटकांची गैरसमज पसरुन कोणी अडवणुक करु नये –  मुख्याध्यापक संघातर्फे वामन तर्फे,  गुरुदास कुसगांवकर यांचे आवाहन.

सिंधुदुर्गनगरी : शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांसंदर्भात उद्या होणाऱ्या आंदोलनात शिक्षण क्षेत्राशी निगडीत सर्व घटकांनी सहभागी व्हावे..स्वेच्छेने सहभागी होणाऱ्या घटकांची गैरसमज पसरुन कोणी अडवणुक करु नये असे आवाहन मुख्याध्यापक संघातर्फे वामन तर्फे,  गुरुदास कुसगांवकर यांनी केलं आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागामध्ये शासन स्तरावर अनेक विषय प्रलंबित आहेत या विविध मागण्यांच्या संदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या दिनांक 19 जुलै 2024 रोजी पुणे येथे संपन्न झालेल्या सभेत ठरल्यानुसार या मागण्यांची जाणीव शासनाला होण्यासाठी मंगळवार दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 ते 4 या वेळेत ओरोस येथे आंदोलन व मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे..एकाचवेळी राज्यभर हे आंदोलन होणार आहे.हे आंदोलन संस्था चालक संघटना, सर्व संस्था चालक, जिल्ह्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांना बरोबर घेऊन एकत्रितपणे करण्यात येणार आहे .या आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रातील सर्व घटकांनी सहभागी व्हावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तथा एज्युकेशनल जर्नलचे संपादक  वामन तर्फे व सचिव  गुरुदास कुसगांवकर यांनी सर्व पदाधिकारी कार्यकारिणी सदस्य व सर्व मुख्याध्यापकांच्या वतीने केले आहे.

तसेच स्वेच्छेने रीतसर आपले कर्तव्य करुन मोर्चात सहभागी होणाऱ्या शिक्षण क्षेत्रातील घटकांमध्ये गैरसमज पसरुन कोणी अडवणुक करु नये.तसेच प्रसार माध्यमांनी याला व्यापक प्रसिद्धी द्यावी अशी विनंती केली आहे.. आंदोलनतील आमचे प्रश्न संस्था, मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक विद्यार्थी यांच्याशी थेट संबंध असणारे आहेत.शासन स्तरावर गेल्या अनेक वर्ष माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर अनेक वर्ष अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. शासनाचे वारंवार याकडे लक्ष वेधून सुद्धा शासनाने या रास्त मागण्यांकडे दुर्लक्ष केलेले आहे .या मागण्यांमध्ये शिक्षक शिक्षेतर कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना जाहीर करावी, पवित्र पोर्टल वरील शिक्षक नियुक्ती ताबडतोब करावी अथवा संस्थेला शिक्षक नियुक्तीसाठी परवानगी द्यावी. शिक्षकेतर भरती करावी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मान्यता मिळाव्यात, अल्पभाषिक व अल्पसंख्याक शाळातील रिक्त पदांची शिक्षक भरती करण्याची परवानगी मिळावी, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेला टप्पा अनुदान प्रचलित पद्धतीने ताबडतोब जाहीर करावे ,वेतनेतर अनुदान सातव्या वेतन आयोगानुसार शाळांना मिळावे, 15 मार्च 2024 चा जाचक शासन निर्णय रद्द करावा किंवा दुरुस्ती करावी .या शासन निर्णयानुसार सिंधुदुर्गातील अनेक शाळा बंद होणार आहेत ,वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक शिक्षेतरकर भरतीसाठी परवानगी मिळावी , मुल्यांकन पात्र ठरलेल्या सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांना अनुदान जाहीर करावे, शाळा तेथे मुख्याध्यापक द्यावा, शाळा तिथे प्रयोगशाळा कर्मचारी द्यावा शाळा तेथे कला क्रीडा शिक्षक भरती करावी, शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद करावीत ,शिक्षकेतर संचमान्यता नवीन निकष अनुसार अतिरिक्त ठरलेल्या वरिष्ठ लिपिकांना सेवानिवृत्तीपर्यंत त्या शाळेत कार्यरत ठेवावे , मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावेत अशा आणि इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे .आज माननीय जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक सिंधुदुर्ग, माननीय पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग ओरोस पोलीस स्टेशन या ठिकाणी या आंदोलनाचे नोटीस देण्यात आले. यावेळी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री वामन तर्फे, सचिव श्री गुरुदास कुसगावकर ,उपाध्यक्ष श्री रामचंद्र घावरे, श्री हनुमंत वाळके कार्यकारणी सदस्य श्री रत्नाकर सरवणकर,श्री सुभाष दहिबांवकर श्री प्रमोद कांबळे सर श्री जयवंत ठाकूर सर श्री शरद चोडणकर सर ,श्री भरत सराफदार सर, वेंगुर्ला तालुका सचिव श्री सोन्सुरकर सर ,सावंतवाडी तालुका अध्यक्ष श्री सावंत सर, मालवण तालुका सचिव श्री घाडी सर कणकवली तालुका सचिव श्री अत्तार सर ,अध्यापक संघाचे अध्यक्ष श्री अजय शिंदे सर सचिव श्री.मयेकर सर, कास्ट्ईब महासंघाचे राज्य उपाध्यक्ष श्री संदीप कदम सर जिल्हा सचिव श्री अभिजीत जाधव, मराठा महासंघाचे अध्यक्ष श्री दिनेश म्हाडगुत इत्यादी उपस्थित होते.हे आंदोलन यशस्वी करून शासनापर्यंत आपल्या मागण्या पोहचविण्यासाठी संस्था चालक संघटना, सर्व संस्था चालक, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर संघटना आणि शिक्षण क्षेत्रातील सर्व व्यक्तींनी, पालकांनी सहकार्य करावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने अध्यक्ष श्री.वामन तर्फे, सचिव श्री गुरुदास कुसगांवकर, सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांनी केले आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles