Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ४२,९४१ भगिनी पात्र – प्रसन्ना उर्फ बाळु देसाई यांची माहिती.

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार सावंतवाडी विधानसभा क्षेत्रनिहाय समिती गठीत, अध्यक्षपदी श्वेता कोरगावकर व सदस्यपदी प्रसन्ना देसाई व एकनाथ नाडकर्णी यांची निवड.

  • सिंधुदुर्गनगरी : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर विधानसभा क्षेत्रनिहाय समिती गठीत करण्यात आली . या समितीच्या अध्यक्ष , सदस्य , सदस्य सचिव यांची बैठक सिंधुदुर्गनगरी ओरस येथील जिल्हाधिकारी दालन येथे जिल्हाधिकारी किशोर तावडे व जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच प्रांताधिकारी व महीला बालकल्याण विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली .
    या बैठकीत आतापर्यंत प्राप्त लाभार्थी यादीस मंजुरी देण्यात आली. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत १,३५,५२७ लाभार्थ्यांच्या अर्जांना मंजुरी देण्यात आली . यात सावंतवाडी तालुक्यातील २१,२२८ , दोडामार्ग तालुक्यातील ६४०६ व वेंगुर्ले तालुक्यातील १५,३०७ पात्र लाभार्थी मंजूर करण्यात आले .
    ” मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण ” ही योजना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात अत्यंत प्रभावीपणे राबवली गेली . भाजपा लोकप्रतिनिधी , पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच गावच्या सरपंचांनी शासनाला सहकार्य करत या योजनेची अंमलबजावणी होण्यासाठी सहभाग घेतला . त्यामुळेच सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील ४२,९४१ भगिनींना रक्षाबंधना दिवशी जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांची ३००० रुपयांची रक्कम थेट खात्यात जमा होणार आहे .

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles