सावंतवाडी : राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर हे नेहमी सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यासाठी मदत करत असतात. आपले वडील वसंतशेठ केसरकर यांच्या दातृत्वाचा वसा आणि वारसा मंत्री दीपक केसरकर यांनी सुरूच ठेवला असून ते नेहमी सामाजिक, धार्मिक कार्यासाठी वेळोवेळी आर्थिक मदत करत असतात.
कोलगाव – कासारवाडी येथील कालिका मंदिर तसेच भवानी मंदिरात देवीचा नवरात्रौत्सव सुरू असल्याने या दोन्ही मंडळांना नामदार दीपक केसरकर यांनी आर्थिक मदत करून आपल्या दातृत्वाची पुन्हा प्रचिती दिली आहे. शिक्षण मंत्री केसरकर यांच्या या दातृत्वामुळे कोलगाव कासारवाडी येथील नागरिकांनी त्यांचे विशेष आभार मानले आहेत.


