संजय पिळणकर
दोडामार्ग: उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षमार्फत आयोजित जि.प.पूर्ण प्राथ.केंद्रशाळा सोनावल शाळेत शनिवार दि ५ ऑक्टो.२०२४ रोजी ‘महाआरोग्य शिबिर’ संपन्न झाले.
या आरोग्य शिबिराचे उदघाटन एस्.एस्.पी.एम् मेडिकल कॉलेज अँड लाईफ टाईम हॉस्पिटल पडवेचे डॉ.सांबारे,डॉ.कामत,डॉ.उपासना, समन्वयक संजय पिळणकर, व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रमोद गवस यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलननाने करण्यात आले.
या शिबिराचे समन्वयक व आयुर्विमा प्रतिनिधी संजय पिळणकर यांनी उपमुख्यमंत्री या निशुल्क आरोग्य शिबिराबाबत माहिती दिली,या शिबिराचा उद्देश सांगितला व अतिशय दुर्गम भागात व्यवस्थापन समिती,ग्रामस्थ व सहकारी शिक्षकांना सोबत घेऊन या प्रशालेच्या उपक्रमशील मुख्यद्यापिका व आदर्श शिक्षिका सौ.गीतांजली सातार्डेकर – पिळणकर यांनी आरोग्य शिबिराचे केलेले नियोजन व त्यामुळे परिसरातील १४३ आबाल वृद्धांना त्याचा झालेला लाभ यामुळे त्यांचे व या शाळा बाह्य उपक्रमाचे विशेष अभिनंदन केले.
सदर शिबिरामध्ये हृदयरोग तपासणी,नेत्ररोग तपासणी, अस्थिरोग तपासणी,स्त्रीरोग तपासणी,थायरॉईड,रक्त तपासणी, शुगर तपासणी,इसीजी आदी
चाचण्या निशुल्क करण्यात आल्या.तसेच लाभार्थ्यांना मोफत औषधे यावेळी उपलब्ध करून देण्यात आली.
यावेळी लाईफ टाईम हॉस्पिटल पडवेची तेरा जणांची टीम उपस्थित होती.हे शिबिर यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक श्रीम.संजीवनी बल्लाळ,संदिप सूर्यवंशी,परशुराम पाटील,पालक, ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमामुळे शाळेचे विद्यार्थी,पालक,ग्रामस्थ यांना मोफत व चांगली आरोग्य सेवा प्राप्त झाली. या स्तुत्य उपक्रमाबद्दल व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापिका सौ.गीतांजली सातार्डेकर यांचे पालक व ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मुख्याध्यपिका सौ.गीतांजली सातार्डेकर यांनी केले.