मोठी बातमी ! – इस्लामाबादमध्ये नको तेच घडलं. ; इराण-अमेरिकेतील चर्चा फिस्कटली!

इस्लामाबाद : पाकिस्तानमधून जगाची चिंता वाढवणारी बातमी आली आहे. अमेरिका-इराण युद्धविरामानंतर इस्लामाबादमध्ये दोन्ही देशांच्या प्रतिनिधींची बैठक झाली आणि शांततेसाठी त्यांची चर्चा सुरी होती. मात्र अमेरिका आणि इराण, य़ा दोघांमधील तील वाटाघाटी फिस्कटल्या आहेत. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांनी रविवारी पहाटे पत्रकार परिषद घेत जाहीर केलं की, ते इराणसोबत कोणताही करार न करता वॉशिंग्टनला परतणार आहेत. इराण अमेरिकेच्या अटी स्वीकारत नाहीये त्यामुळे शिष्टमंडळ अमेरिकेत परत जात असल्याचं व्हान्स म्हणाले. जेडी व्हान्स यांनी आज (12 एप्रिल) पहाटे घेतलेल्या पत्रकार परिशषदेत या चर्चेसंबंधी माहिती दिली. इराणसोबतच्या वाटाघाटींमध्ये त्रुटी राहिल्या असून, इराणी शिष्टमंडळाने वॉशिंग्टनच्या अटी मान्य केलेल्या नाहीत. अमेरिका करारासाठी तयार आहे, परंतु इराणने मोठे अडथळे निर्माण केले आहेत असंही त्यांनी सांगितलं.

दोन्ही देशातील चर्चा फिस्कटली…

जवळपास 21 तास चाललेल्या उच्चस्तरीय चर्चेनंतर, व्हान्स यांनी सांगितलं की दोन्ही देशांमध्ये “समाधानकारक करार” झालेला नाही. अमेरिकेने आपला अंतिम आणि सर्वोत्तम प्रस्ताव सादर केला होता, परंतु इराणने तो स्वीकारला नाही. अमेरिकेने आपल्या अटी आणि मर्यादा आधीच स्पष्टपणे सांगितल्या होत्या, ज्यामध्ये कुठे लवचिकता दाखवली जाऊ शकते आणि कोणत्या मुद्द्यांवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही याचा समावेश होता असंही त्यांनी स्पष्ट केलं.

‘ वाईट बातमी ही आहे की, आमच्यात करार झालेला नाही. मला वाटते की ही अमेरिकेपेक्षा इराणसाठी जास्त वाईट बातमी आहे. त्यामुळे, कोणताही करार न करताच आम्ही अमेरिकेकडे परत जात आहोत… त्यांनी आमच्या अटी स्वीकारण्यास नकार दिला आहे.’ असं या निवेदनादरम्यान जेडी व्हान्स म्हणाले. ” या चर्चेत ज्या काही उणिवा होत्या, त्या पाकिस्तानींमुळे नव्हत्या; त्यांनी उत्कृष्ट काम केलं आणि आम्हाला व इराणला मतभेद मिटवून करारापर्यंत पोहोचण्यास मदत करण्याचा खरोखरच प्रयत्न केला. आम्ही गेल्या 21 तासांपासून वाटाघाटी करत आहोत आणि इराणींसोबत अनेक महत्त्वाच्या चर्चा केल्या आहेत.” असंही व्हान्स यांनी नमूद केलं.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles