शिक्षकावर जीवघेणा हल्ला, माजी विद्यार्थ्याने केले सपासप वार!

छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही काळापासून राज्यातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले आहे. अनेक ठिकाणी खून, मारामारी, हल्ले होताना पहायला मिळत आहेत. अशातच आता छत्रपती संभाजीनगरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील छावणी परिसरातील नामांकित ‘लिटिल फ्लॉवर’ शाळेत भरदुपारी एका माजी विद्यार्थ्याने टीसी (दाखला) देण्याच्या कारणावरून एका शिक्षकावर धारदार चाकूने प्राणघातक हल्ला केला. या जीवघेण्या हल्ल्यात शिक्षक रक्ताच्या थारोळ्यात कोसळले असून ते गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी – समोर आलेल्या माहितीनुसार, एका अल्पवयीन तरुणाने विशाल फ्रान्सिस दुसिंग (रा. पेठे नगर) या शिक्षकावर जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात शिक्षक गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला आहे. आता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित माजी विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच छावणी पोलीसांनी या प्रकरणाच्या तपासाला सुरूवात केली आहे.

व्हिडिओ आला समोर –

या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. यात दिसत आहे की संबंधित माजी विद्यार्थी हा एका कॅबिनमध्ये महिला शिक्षिका आणि विशाल फ्रान्सिस दुसिंग यांच्याशी बोलत आहे. यावेळी त्यांच्यात वाद होताना दिसत आहे. काही वेळानंतर हा तरूण आपल्या खिशात लपवलेला चाकू बाहेर काढतो आणि शिक्षकाच्या पोटावर वार करतो. या शिक्षक गंभीर जखमी झाला आहे. केबिनमधील शिक्षिका आणि बाहेरील कर्मचारी या युवकाला थांबवण्याचा प्रयत्न करतात, मात्र तो त्यांच्यावर ओरडतो आणि त्यांनाही चाकूचा धाक दाखवत असल्याचे समोर आले आहे.

आरोपी पोलिसांच्या ताब्यात –

या प्रकरणावर बोलताना पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले, संबंधित विद्यार्थी 2023 साली नापास झाला होता, तो आज शाळेत आला आणि त्यांने टीसी मिळावा यासाठी प्राचार्यांकडे मागणी केली. त्याचा निकाल का चुकीचा आला यासाठी वर्गशिक्षकाला बोलावण्यात आले, याच शिक्षकावर त्याचा पहिल्यापासून राग होता. आज या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला आणि विद्यार्थ्याने चाकू बाहेर काढला आणि शिक्षकावर हल्ला केला. सध्या शिक्षकावर उपचार सुरू आहेत. आरोपी 17 वर्षांचा असून त्याला ताब्यात घेतले आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles