कणकवली : सिंधुदुर्गात साहित्य चळवळीला अधिक चालना देण्यासाठी नव्याने सम्यक संबोधी साहित्य संस्था स्थापन करण्यात आली आहे. सदर संस्थेच्या अध्यक्षपदी किशोर कदम तर कार्यवाहपदी सूर्यकांत साळुंखे यांची निवड करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात साहित्य सांस्कृतिक क्षेत्रात विविध संस्था कार्यरत आहेत. या पार्श्वभूमीवर साहित्याच्या शेवटच्या घटकाला अधिक न्याय मिळावा या विचाराने सम्यक संबोधी ही साहित्य संस्था सुरू करण्यात आली आहे. सम्यक संबोधी म्हणजे अतुलनीय – परिपूर्ण ज्ञान. हाच विचार केंद्रस्थानी ठेवून सदर संस्था कार्यरत राहणार असून साहित्याच्या परिपूर्ण ज्ञानापासून वंचित घटक दूर राहू नये आणि त्याच लेखन सर्वदूर पोहोचव ही संकल्पना समोर ठेवून या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे आणि त्याप्रमाणेच या संस्थेला ‘सम्यक संबोधी’ हे नावही देण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष किशोर कदम यांनी दिली.
संस्थेची कार्यकारणी पुढील प्रमाणे – अध्यक्ष- किशोर देऊ कदम,सचिव – सूर्यकांत साळुंके, उपाध्यक्ष संदीप हरी कदम, खजिनदार – नेहा कदम,सदस्य सत्यवान साटम,सदस्य संदेश सुदर्शन नाईक,संतोष अनिल कदम.धम्मपाल विजय बाविस्कर. दरम्यान या साहित्य चळवळीतर्फे जिल्ह्याच्या विविध भागात साहित्यिक कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या संस्थेतर्फे विविध ग्रंथांना साहित्य पुरस्कार देण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर जानेवारीमध्ये या संस्थेचे संमेलन आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही श्री कदम यांनी दिली.
सम्यक संबोधी साहित्य संस्थेच्या अध्यक्षपदी किशोर कदम तर सचिवपदी सूर्यकांत साळुंखे.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


