स्थानिकांना रोजगार हाच विकासाचा पाया! ; कोकणातील युवकांच्या भविष्यासाठी ५ जुलैला भव्य मोटारसायकल रॅली.

विकसित कोकण, समृद्ध कोकणासाठी युवकांचा एल्गार!

– युवा सामाजिक संस्थांचा निर्धार!

देवगड :  स्थानिक युवकांना रोजगार हाच कोकणातील युवकांच्या भविष्याचा विचार, विकसित कोकण तेव्हाच समृद्ध कोकण निर्माण होईल अशी मागणी करणारी स्थानिक रोजगारनिर्मिती आणि पर्यावरणपूरक विकासाच्या समर्थनार्थ रविवारी, ५ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता जामसंडे येथील दिरबादेवी स्टॉप येथून भव्य मोटारसायकल रॅली निघणार आहे.या रॅलीत मोठ्या संख्येने युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

‘ही रॅली एकजुटीसाठी, युवकांच्या भविष्यासाठी’ आहे.”फिरायला कोकणात यायचं, मग नोकरीला कोकणाच्या बाहेर का जायचं?” असा सवाल करणारी आहे. युवकांनी मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी होऊन कोकणाच्या विकासासाठी एकजूट दाखवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. रॅलीत पर्यावरणपूरक विकास प्रकल्प, स्वच्छ ऊर्जा, हरित व समृद्ध कोकण तसेच स्थानिकांना रोजगार या मुद्द्यांवर जनजागृती करण्यात येणार आहे.
चुकीच्या प्रचाराला बळी न पडता जागृत व्हा. कोकणातील युवकांचा रोजगार दुसऱ्या राज्यात जाऊ नये, यासाठी एकत्र येण्याची गरज आहे,” असा संदेश या रॅलीतून देण्यात येणार आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles