एआय आणि डेटा सायन्समध्ये विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख दिशा! ; श्री पंचम खेमराज महाविद्यालयात प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात.

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी येथील माहिती तंत्रज्ञान, डेटा सायन्स व संगणक शास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “AI and Data Science Certificate Course and Internship Program” या उपक्रमाच्या प्रमाणपत्र वितरण सोहळ्याचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले.

विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) आणि डेटा सायन्स या अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये उद्योगाभिमुख प्रशिक्षण मिळावे, तसेच त्यांच्या रोजगारक्षम कौशल्यांचा विकास व्हावा, या उद्देशाने महाविद्यालयाने हा विशेष उपक्रम राबविला. या अंतर्गत विद्यार्थ्यांनी एक वर्षांचा AI and Data Science Certificate Course यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर एक वर्षाचा उद्योगाभिमुख Internship Program देखील पूर्ण केला.

या अभ्यासक्रमामध्ये Python Programming, Artificial Intelligence यांसह विविध प्रगत तांत्रिक मॉड्यूल्सचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राशी संबंधित व्यावहारिक ज्ञान, तांत्रिक कौशल्ये आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सखोल माहिती प्राप्त झाली. संपूर्ण प्रशिक्षण व इंटर्नशिप कार्यक्रम मुंबईस्थित Ampiest Engineers OPC Pvt. Ltd. चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्री. मोरेश्वर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला.

या अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, सन २०२३-२५ या कालावधीत ३५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. तर सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात ५६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने या अभ्यासक्रमाची वाढती लोकप्रियता अधोरेखित झाली आहे.

अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त मा. युवराज लखमसावंत भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी संस्थेचे सदस्य श्री. जयप्रकाश सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल, आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. बी. एन. हिरामणी, आयटी समन्वयक डॉ. उमेश पवार, संगणक शास्त्र विभागाचे समन्वयक प्रा. योगेश पवार, माहिती तंत्रज्ञान विभागप्रमुख प्रा. सौ. ए. वाय. गोडकर, संगणक शास्त्र विभागप्रमुख प्रा. सौ. व्ही. व्ही. गवंडे, डेटा सायन्स विभागप्रमुख प्रा. सौ. स्नेहल नाईक, तसेच प्रा. प्रणाम कांबळे, प्रा. आदित्य वर्दम, प्रा. सिद्धिविनायक सावंत, प्रा. एस. एस. नाईक, प्रा. तन्वी शिंदे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना Artificial Intelligence, Data Science, Machine Learning आणि Data Analytics या क्षेत्रांमध्ये करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे सांगितले. उद्योगाभिमुख प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, तांत्रिक कौशल्ये आणि रोजगारक्षमता निश्चितच वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाविद्यालय आणि उद्योग क्षेत्रातील सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव मिळत असून, भविष्यातील करिअरसाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे नियोजन माहिती तंत्रज्ञान व संगणक शास्त्र विभागातील सर्व प्राध्यापकांनी केले. विद्यार्थ्यांनीही कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सक्रिय सहभाग नोंदविला. उपस्थित मान्यवर, पालक आणि विद्यार्थ्यांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत भविष्यात अशा उद्योगाभिमुख अभ्यासक्रमांची संख्या वाढविण्याची अपेक्षा व्यक्त केली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles