मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलची अवनी गवस पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत अव्वल!

सावंतवाडी:  सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडीची इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी कु.अवनी महेश गवस हिने कोकण सिंधू पॉवरलिफ्टिंग असोसिएशन द्वारे आयोजित पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सब- ज्युनियर गटात तसेच सीनियर पॉवरलिफ्टिंग गटात प्रथम क्रमांक पटकावत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.
या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले ,चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले,कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले , विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व मंडळाचे संचालक श्री दिलीप देसाई , मंडळाचे सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत ,डॉ.सतीश सावंत ,मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगांवकर , क्रिडा शिक्षक श्री. भूषण परब तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles