अभिमानास्पद! – युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांना ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज गौरव सन्मान पुरस्कार २०२६’ प्रदान. ; रक्तदान चळवळीतील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरीय दखल.

सावंतवाडी : गेली ११ वर्षे सातत्याने रक्तदान चळवळ उभी करून रुग्णसेवा, निस्वार्थ समाजसेवा आणि जनहिताचे कार्य करणाऱ्या युवा रक्तदाता संघटना, सावंतवाडीचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांच्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे. अरिहंताण रक्त सारथी संस्थान, राजस्थान यांच्या वतीने मुंबई येथे आयोजित भव्य राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात संघटनेला प्रतिष्ठेचा ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज गौरव सन्मान पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला.

रक्तदान क्षेत्रात सातत्यपूर्ण जनजागृती, गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध करून देण्यासाठी केलेले प्रयत्न तसेच आरोग्य व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा सन्मान देण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर ऋतु तावडे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून आमदार सुनील प्रभू, अरिहंताण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलासजी जैन, कारगिल युद्धातील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त डॉ. सुरेश सैनी, सिने अभिनेत्री पियू चौहान, मालाड विभागाचे डीएसपी अजित बहाडणे, मुंबई महानगरपालिका प्रशासकीय प्रमुख विनय पैठी, युनिक ब्लड मोटिव्हेटर्स, मुंबईचे अध्यक्ष जय साटेलकर, अमोल सावंत, मांगिलाल देवासी तसेच देशभरातील रक्तदान क्षेत्रात कार्यरत विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

या सोहळ्यात महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक आणि इतर क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. या सन्मानामुळे युवा रक्तदाता संघटना, सावंतवाडी यांच्या कार्याला नवी प्रेरणा मिळाली असून, भविष्यातही अधिक व्यापक स्वरूपात रक्तदान जनजागृती व रुग्णसेवा सुरू ठेवण्याचा निर्धार संघटनेने व्यक्त केला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles