Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

मुंबईत सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग, कामगार अडकल्याची भीती ; अग्निशमनच्या गाड्या दाखल.

मुंबई : शहरातील अंधेरी पूर्वेत असलेल्या एमआयडीसी परिसरात भंगारवाडीमध्ये चार ते पाच लाकडाच्या दुकानात मोठी आग लागली आहे. संध्याकाळी 7:30 च्या सुमारास एमआयडीसी भंगारवाडी परिसरात चार ते पाच गाळ्यात मोठी आग लागली. लाकूड गोदाममध्ये सिलेंडर ब्लास्ट झाल्यामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आजूबाजूला मोठ्या प्रमाणात गाळे आहेत, आणि या गाळात केमिकल आणि लाकूडचा गोदाम असल्यामुळे 8 ते 10 गाळ्यात आग वाढली आहे. आगीचे वृत्त समजताच स्थानिकांनी अग्निशमन दलास पाचारण केले. तसेच, परिसरातील नागरिकांनीही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या आगीत आठ ते दहा सिलेंडर ब्लास्ट झाल्याची माहिती आहे.

आगीचे माहिती मिळताच अग्निशमन दलाचा पाच ते सहा गाड्या घटनास्थळावर दाखल होऊन आग आटोक्यात आणण्याचे काम युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. या सर्व गोदामला मोठ्या संख्येमध्ये काम करणारे कामगार आहेत. काही कामगार बाहेर निघाल्याची माहिती मिळत आहे, तर काही कामगार आत अडकल्याचा भीती देखील व्यक्त केली जात आहे. आजूबाजूला जेवढे घर आहेत, जवळपास सर्व घरांमध्ये आग पसरत आहे. परिसरातील पंधरा ते वीस घर आणि गोदाम जळून खाक झाले आहे, हीआग अजून मोठी होत चालली आहे.

घरात आणि गोदाममध्ये मोठ्या प्रमाणात सिलेंडर असल्यामुळे ही आग वाढली. झोपडपट्टी मधून लोकांना बाहेर काढण्याचे काम एमआयडीसी पोलिसांकडून सुरू आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात सिलेंडर ब्लास्ट होत असल्यामुळे अग्निशमन दलातील जवानांना आग विझवण्यामध्ये अडथळा निर्माण होत आहे.दरम्यान, स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळावर दाखल होऊन झोपडपट्टी खाली करत आहेत. आग विझवायचा प्रयत्न देखील अग्निशमन दलाचे जवानांकडून युद्धपातळीवर सुरू आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles