सावंतवाडी : तालुक्यातील आजगाव येथे आजगाव पंचक्रोशीतील मुलांना किशोर दिवाळी अंक नुकताच भेट देण्यात आला. एकूण २५ मुलांनी नोंदणी केली होती, १८ मुले उपस्थित होती. बाहेरगावी गेल्यामुळे न आलेल्या मुलांनाही अंक घरपोच देण्यात येईल. मुले अंकांचं परिक्षण लिहितील. उत्कृष्ट परिक्षण केलेल्या ३ मुलांच्या घरी किशोर मासिक वर्षभर विनामूल्य पाठविण्यात येईल. याशिवाय सर्व मुलांसाठी कुल्फी, गोट्या, साधना, शब्दशिवार, टिंकल, बालकुमार असे अन्य १० अंक वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आरवली-टाक हायस्कूलचे मुख्याध्यापक मोहन जाधव उपस्थित होते, तर मार्गदर्शक म्हणून सौ. अश्विनी पडवळ होत्या. पू. गोगटे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आयोजित केलेला हा कार्यक्रम गुरुजींच्या विद्यार्थिनी माधुरी काकतकर-आठल्ये व विजया आजगावकर- वाडकर यांनी पुरस्कृत केला होता. कार्यक्रमाला महादेव मराठे, संतोष राणे, राजेश आव्हाड आणि झोळंब्याचे भालचंद्र जोशी , विनय सौदागर आदि उपस्थित होते.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


