Wednesday, July 16, 2025

Buy now

spot_img

विराट कोहली अन् बाबर आझमची जोडी कमाल करणार? ; भारत अन् पाकिस्तानचे खेळाडू १७ वर्षानंतर एकाच संघातून खेळण्याची शक्यता.

नवी दिल्ली : आफ्रो-आशिया क्रिकेट स्पर्धा पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. आफ्रिका क्रिकेट असोसिएशनने शनिवारी वार्षिक बैठक घेतली. त्या बैठकीत 6 लोकांच्या एका अंतरिम समितीची स्थापना करण्यत आली आहे. ही समिती आप्रिका आणि आशियाच्या क्रिकेटपटूंना अदिक संधी देण्यासंदर्भात पावलं उचलेल. ही समिती इतर देशांच्या क्रिकेट संघांसोबत संपर्क साधून दोन्ही खंडामधील क्रिकेट खेळणाऱ्यांच्या एक टीम बनवून स्पर्धा आयोजित करण्यात येऊ शकते. आफ्रो-आशिया स्पर्धा देखील त्याचा भाग असू शकते. ही क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे.

आफ्रो- आशिया कपमध्ये आशिया XI आणि आफ्रिका XI हे दोन संघ आमने सामने येतात. ही स्पर्धा पहिल्यांदा 2005 मध्ये खेळवली गेली होती. त्या स्पर्धेचं आयोजन दक्षिण आफ्रिकेनं केलं होतं. दक्षिण आफ्रिकेनंतर 2007 मध्ये त्या स्पर्धेचं आयोजन भारतानं केलं होतं. या स्पर्धेचं तिसरं पर्व केनियामध्ये होणार होतं. मात्र, त्या वर्षी आफ्रो-आशिया कप खेळवला गेला नव्हता. या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू एकत्र खेळताना पाहायला मिळू शकतात. भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या 15 वर्षात एकही मालिका झालेली नाही. अशावेळी ही स्पर्धा क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरु शकते.

ईएसपीएन क्रिकइन्फो नुसार ACA चे प्रभारी अंतरिम चेयरमन तावेंगा मुकुलानी यांनी एका पत्रकार परिषदेत क्रिकेटमध्ये अधिक संधी उपलब्ध करण्यासोबत आफ्रो-आशिया कप दोन्ही खंडातील क्रिकेट बोर्डासाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरु शकेल, असं म्हटलं. मुकुलानी म्हणाले की, “आम्ही आशिया क्रिकेट काऊन्सिलच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत आहोत. आफ्रिकेतील क्रिकेट संघांसाठी देखील संपर्क साधण्यात आला आहे. ते सर्व संघ आफ्रो-आशिया कप सुरु करण्याच्या बाजूनं आहेत, असं मुकुलानी म्हणाले.

2005 मध्ये तीन सामन्यांची मालिका झाली होती. आफ्रो-आशिया मालिका त्यावेळी 1-1 अशा बरोबरीत सुटली होती.  वीरेंद्र सेहवाग, शाहीद आफ्रिदी आणि सनथ जयसूर्या एकत्र खेळले होते. 2007 मध्ये आशिया XI ने 3-0 ने आफ्रिकेला XI ला पराभूत केलं होतं. त्यावेळी शोएब अख्तर, एमएस धोनी, झहीर खान आणि मोहम्मद आसिफ हे खेळाडू एकत्र खेळले होते.

दरम्यान, आफ्रो- आशिया स्पर्धा सुरु झाल्यास भारताचा अनुभवी खेळाडू विराट कोहली आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम एकत्र खेळताना पाहायला मिळतात का?, हे पाहावं लागेल.

ADVT –

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles