Monday, November 10, 2025

Buy now

spot_img

पंधरा वर्षात लोकप्रतिनिधींनी किती जणानां रोजगार दिले? ; अपक्ष उमेदवार अर्चना घारे – परब यांचा सवाल.

सावंतवाडी : नव्वदच्या दशकानंतर भारताने डंकेल प्रस्ताव स्विकारला. देशाने स्वीकारलेल्या खुल्या अर्थव्यवस्थेमुळे सरकारी नोकऱ्या हा विषय दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात संपुष्टात आला. खाजगीकरणामुळे कंञाटी कामगार व्यवस्था निर्माण झाली. कंञाटी कामगार ही एक प्रकारची वेठबिगारीच. यामध्ये संबंधित कंत्राटदार हा त्या कामगारांचे आर्थिक शोषण करत असतो.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील जेव्हा आपण गावागावात फिरले तेव्हा असंख्य बेरोजगार युवक- युवतीनी आपल्या समस्या मांडल्या. हाताना काम नाही त्यामुळे अनेक सुशिक्षित तरुण वाम मार्गाकडे वळत आहेत. दोडामार्ग, सावंतवाडी vengurla या तालुक्यातील अनेकांनी नोकरी नाही, कामधंदा नाही म्हणून आपले जीवन संपवले. गोवा राज्यातील लगतच्या काही गावातील तरुण- तरुणी अगदी दहा बारा हजारांसाठी गोव्यात जातात. एवढ्या तुटपुंज्या पगारात त्या ठिकाणी खोली घेऊन रहाणे शक्य नसते. काहीजणांचे प्रवास करताना दुर्दैवी अपघातात निधन झाले.

अशी विदारक परिस्थिती असताना आणि सत्ता असताना स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी का प्रयत्न झाले नाहीत.? निवडणूका जवळ आल्या की नेहमीप्रमाणे लोकांना पोकळ आश्वासन द्यायची. खोट्या घोषणा करायच्या आणि निवडून यायचं हा फंडा गेली पंधरा वर्षे चालला.

चष्म्याच्या कारखान्याची घोषणा केलेली होती की ज्यातून म्हणे एक हजार बेरोजगारांना रोजगार मिळणार होता. अंतराचा कारखाना, पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार, एज्युकेशनल हब , प्रक्रिया उद्योग अशा एक नव्हे अनेक घोषणा केल्या पण प्रत्यक्षात जमीनीवर काहीच नाही.

एकंदरीत सातत्याने गेली पंधरा वर्षे वेगवेगळ्या पक्षात जावून फक्त आपली खुर्ची टिकवण्यासाठी जनतेच्या तोंडाला पान फुसण्याच काम अविरतपणे सुरू आहे. जर खरोखरच काम केल असत तर निरनिराळ्या माध्यमातून प्रलोभन देण्याची वेळ आली नसती. यावेळी या मतदारसंघातील सुज्ञ जनता अशा प्रलोभनांना व आभासी विकासाच्या पोकळ घोषणाना मुळीच बळी पडणार नाही. सत्तेसाठी आपलं इमान गहाण ठेवणाऱ्याना व मतदारांना कायम स्वरूपी गृहीत धरून पक्ष बदलणाऱ्याना या मतदारसंघातील स्वाभिमानी जनता निश्चितपणे अद्दल घडवणार आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles