Tuesday, December 9, 2025

Buy now

spot_img

”बॅगेत कपडे आहेत, युरीन पॉट नाही’ ‘; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगची झाडाझडती ; उद्धव ठाकरेंना लगावला टोला.

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या स्थिर पथकाकडून सध्या बड्या राजकीय नेत्यांच्या बॅगा तपासणीचं काम सुरू आहे. थेट हेलिपॅडवरच निवडणूक आयोगाचे कर्मचारी बॅगा तपासतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. शिवसेना युबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यवतमाळमधील वणी मतदारसंघात आणि लातूरच्या औसा मतदारसंघातील सभेसाठी जात असताना त्यांच्या बॅगा तपासण्याचा आल्याचा व्हिडिओ स्वत: शूट केला होता. तसेच, ज्याप्रमाणे माझ्या बॅगा तपासल्या तशाच मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही बॅगा तपासा. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या बॅगा तपासल्याचे व्हिडिओही मला पाठवा, असेही त्यांनी म्हटले होते. उद्धव ठाकरेंच्या या व्हिडिओनंतर आता पालघर मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही बॅगांची झाडाझडती घेण्यात आली आहे. यावेळी, मुख्यमंत्र्‍यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

महायुती उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पालघरमध्ये जाहीर सभा घेण्यात आली. या सभेपूर्वी पालघर येथील पोलीस मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं हॅलिकॉप्टर येताच, निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या बॅगांची झाडाझडती घेतली. यावेळी, मुख्यमंत्र्‍यांनी झाडाझडती घेणाऱ्या अधिकाऱ्यांना उद्देशून उद्धव ठाकरेंना टोला लगावला.ह्या बॅगेत काहीही नाही, बॅगेत कपडे आहेत, युरीन पॉट नाही, असा टोला मुख्यमंत्र्‍यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना लगावला. तसेच, इलेक्शन कमिशन त्यांचं काम करतय. त्यांच्यावर राग कशाला काढता, लाडक्या बहीण योजनेमुळे हे बिथरले आहेत, त्यामुळे ते कोणावरही आरोप करत सुटल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं.

 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles