सावंतवाडी : भारतीय जनता पार्टीचे बंडखोर व अपक्ष उमेदवार युवा नेते विशाल परब यांना सावंतवाडी मतदारसंघातून प्रत्येक वाडी-वस्तीतून जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.”कोणत्याही परिस्थितीत आमचे हक्काचे आमदार विशाल परब”, अशी खूणगाठचं जनतेने बांधली असून यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहे.
विशाल परब यांनी आजपर्यंत केलेल्या सामाजिक, सांस्कृतिक सेवेचा शंभर टक्के त्यांना लाभ या निवडणुकीत होणार यात शंका नाही. विशाल परब यांच्या प्रचार फेऱ्यांना युवक वर्गातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत असून माय-माऊलींचे आशीर्वाद देखील महत्त्वाचे ठरत आहेत.
दरम्यान विशाल परब यांना मिळत असलेल्या वाढत्या प्रतिसादामुळे विरोधक देखील हातबल झाले आहेत. मात्र विशाल परब कोणावरही टीका न करता केवळ आपण केलेल्या कामाचा आणि रखडलेल्या विकास कामांचा रोड मॅप तयार करून जनतेसमोर मतांचा जोगवा मागत आहेत. ‘आगामी काळात विशाल परब आमदार करणारचं!’ अशी जणू येथील जनतेची इच्छा असल्यामुळेच विशाल परब दिवसागणिक अधिक प्रबळ दावेदार होत आहेत, हे नक्की.!