मिठबांव : सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील एक दानशूर व्यक्तिमत्व असलेले श्री. उदय विठ्ठल फणसेकर यांची क्षा. म. समाज मुंबई विश्वस्त मंडळाच्या विश्वस्त सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतीच विश्वस्त मंडळ व कार्यकारी मंडळाने सदर निवड केली.
श्री. फणसेकर हे अध्यक्ष म्हणून कोचरे ग्रामस्थ मंडळ, मुंबई २, कोचरे विद्या प्रसारक मंडळ मुंबई ३, सह समन्वय-शिवसेना शिवडी विधानसभा, विशेष कार्यकारी अधिकारी, संस्थापक अध्यक्ष -आधार जेष्ठ नागरिक संघ, सिंधुदुर्ग, अध्यक्ष-कोकण उदय प्रतिष्ठान मुंबई, कार्यकारी सदस्य परेल नागरिक को-ऑपरेटिव्ह कंजूमर सोसायटी, मुंबई सहाय्यक सदस्य-स का. पाटील शिक्षण संस्था पाट, सदस्य-स्वामी संस्था मुंबई, माजी कार्यकारणी सदस्य – राष्ट्रीय मिल मजदूर संघ मुंबई, सहाय्यक – सिताराम आनंदाश्रम म्हापण अशा विविध मंडळामध्येही सेवाभावी कार्य करीत असून त्यांच्या एकूण कार्याची दखल घेऊन त्यांची क्षा. म. समाज मुंबई मंडळाच्या विश्वस्त सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या या स्तुत्य निवडीबद्दल क्षा. म. सं. मुंबई व ग्रामीण विभागामार्फत त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.


