Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

जय हो..! – पैलवान अमन सेहरावतने बाजी मारली, ऑलिम्पिकमध्ये ५७ किलो वजनी गटात पटकावलं कांस्यपदक.

पॅरिस : भारतीय पैलवान अमन सेहरावतने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बाजी मारलीये. अमनने 57 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावलं आहे. भारताच्या अमन सेहरावतने प्युर्टो रिकोच्या डॅरियन क्रूजवर 13-5 ने विजय मिळवलाय. भारताचे हे या ऑलिम्पिकमधील सहावे मेडल आहे. भारताने मागील 4 ऑलिम्पिकपासून कुस्ती या क्रिडा प्रकारात मेडल जिंकण्याच परंपरा कायम ठेवली आहे. भारतीय पैलवान 2008 पासून 2024 पर्यंतच्या प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत आले आहेत.

पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचे हे सहावे पदक –

अमन सेहरावतने पहिल्या फेरीत 6-3 अशी आघाडी घेतली होती. या सामन्यात त्याने दमदार सुरुवात केली होती. या लढतीत  त्याने सुरुवातीपासूनच आपला दबादबा ठेवला होता. त्याने प्रतिस्पर्धी पैलवानाला लढतीत आघाडी घेण्याची संधी दिली नाही.  अमनने पहिल्या फेरीत उत्तम बचाव करत गुण मिळवले होते.  पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचे हे सहावे पदक आहे. तत्पूर्वी, नेमबाजीमध्ये मनू भाकर (10 मीटर एअर रायफल), मनू भारत आणि सरबज्योत सिंग (10 मीटर एअर रायफल), स्वप्नील कुसळे (50 मीटर रायफल ) मध्ये पदक पटकावलं आहे. शिवाय भारतीय पुरुष हॉकी संघाने कांस्यपदक जिंकले तर स्टार भालाफेकपटू निरज चोप्राने रौप्य पदक जिंकले आहे.

हरियाणाच्या अमनने सुरुवातीच्या दोन्ही लढती जिंकल्या होत्या –

तत्पूर्वी, अमन सेहरावतला उपांत्य फेरीत जपानच्या अव्वल मानांकित रेई हिगुचीकडून पराभव पत्करावा लागला होता. या पराभवाने त्याचे सुवर्ण पटकवण्याचे स्वप्न भंगले होते. हरियाणाच्या अमनने सुरुवातीच्या दोन्ही लढती  जिंकल्या होत्या. शिवाय, त्याने प्री-क्वार्टर फायनलमध्ये माजी युरोपियन चॅम्पियन नॉर्थ मॅसेडोनियाच्या व्लादिमीर एगोरोव्हचा 10-0 ने पराभव केला होता. यानंतर त्याने क्वार्टर फाइनलमध्ये अल्बेनियाच्या झेलीमखान अबाकारोव्हचा 12-0 असा पराभव केला होता.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles