बांदा : दत्तप्रसाद युवक कला क्रीडा मंडळ नेतर्डे व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २९ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबीर येथील पीएम श्री बांदा केंद्रशाळा नं.१ येथे संपन्न होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष शैलेश लाड यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
गोवा बांबोळी मेडिकल रुग्णालयाची रक्तपेढी रक्त संकलन करणार आहे.लग्नसराई,सण,उत्सव यामुळे शासकीय रक्तपेढीत सध्या रक्ताचा प्रचंड तुटवडा आहे.अपघात तसेच दैनंदिन रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी रक्ताची आवश्यकता असते.आतापर्यंत सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या संस्थेने बांबोळी ब्लड बँकेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मित्र संस्थांच्या सहकार्याने सर्वाधिक रक्तदान शिबिरे आयोजित करून समाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न केला आहे.हि तूट भरून काढण्यासाठीच बांद्यात रक्तदान शिबीर घेण्यात येत असल्याचे शैलेश लाड व संजय पिळणकर यांनी सांगितले.
या शिबिरासाठी सिंधुदुर्गसह संपूर्ण राज्यात रक्तदान,अवयवदान व देहदान हि संकल्पना प्रत्यक्षात राबविणारे सिंधु रक्त प्रतिष्ठान सहकार्य करणार आहे.रक्तदान हे सामाजिक बांधिलकीचा एक भाग असून या पवित्र कार्यात जास्तीत जास्त दात्यांनी रक्तदान करून हे शिबीर यशस्वी करावे असे आवाहन यावेळी सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानचे पदाधिकारी निलेश मोरजकर यांनी केले.
यावेळी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर, सावंतवाडी तालुका कार्यकारिणी सदस्य अक्षय मयेकर,युनिक फाउंडेशनचे अध्यक्ष पत्रकार निलेश मोरजकर,शैलेश लाड,मित्रमंडळाचे सचिव संदीप नार्वेकर,कर सल्लागार समीर परब,राकेश परब आदी उपस्थित होते.
बांदा येथे २९ डिसेंबर रोजी महा रक्तदान शिबिराचे आयोजन!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


