Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

कणकवली येथील विद्यामंदिर प्रशालेच्या विद्यार्थ्यांना इतिहासाची अनुभूती! ; शैक्षणिक सहलीतून घेतले किल्ल्यांचे दर्शन.

कणकवली : येथील विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला विद्यार्थ्यांचे ज्ञानविश्व विस्तारण्यासाठी शैक्षणिक सहलींचे आयोजन करीत असते. यंदाच्या शैक्षणिक वर्षात छत्रपती शिवाजीराजे यांनी जीवापाड जपलेले गडकिल्ले ऐतिहासिक ठेवा विद्यार्थ्यांना सहलीच्या माध्यामातून दाखविण्याचे नियोजन करण्यात आले.  सहल प्रमुख राजेश सिंगनाथ, सुदीन पेडणेकर, प्रसाद राणे यांनी अत्यंत सुंदर आणि नेटके नियोजन करून महाराष्ट्राचा ऐतिहासिक ठेवा विद्यार्थ्यांनी पहावा तसेच आपल्या संस्कृतीचे दर्शन घडावे म्हणून पन्हाळगड तसेच छत्रपतींची राजधानी रायगड या गडकिल्ल्यांचे दर्शन विद्यार्थ्यांनी सहलीतून घेतले.

प्रशालेतून रायगड, गणपतीपुळे, कोल्हापूर असे सातशे विद्यार्थी व शिक्षक सहलींचा लाभ घेऊन ज्ञानविश्व विकसित केले. या शैक्षणिक सहलीसाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. तवटे, चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, सचिव जयकुमार वळंजू यांनी पाठींबा दिला प्रशालेचे मुख्याध्यापक पिराजी कांबळे यांनी सर्वतोपरी सहकार्य करून सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सहकार्यांने या वर्षाची शैक्षणिक सहली यशस्वीरित्या पार पाडली. याकामी विद्यार्थी व पालकांचीही अमूल्य मदत झाली.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles