कणकवली : येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात मुंबई जिमखाना विभागाच्या वतीने १ ते ४ जानेवारी या कालावधीत वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी मुले आणि मुली अशा दोन गटात स्वतंत्रपणे क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले आहे.
या महोत्सवात सकाळी आठ ते दुपारी दोन या कालावधीत धावणे, थाळी फेक, गोळा फेक, उंच उडी, लांब उडी, वैयक्तिक क्रीडा स्पर्धा या वैयक्तिक क्रीडा स्पर्धा बरोबरच कबड्डी, क्रिकेट आणि व्हॉलीबॉल या सांघिक स्पर्धा होणार आहेत.
याबरोबरच इन डोअर क्रीडा स्पर्धेमध्ये कॅरम आणि बुद्धिबळ या स्पर्धा ही एचपीसीएल हॉलमध्ये आयोजित केले आहेत.
वर्षभर अध्ययन अध्यापनात रंगलेले रंगलेले विद्यार्थी पुढील चार दिवस क्रीडा महोत्सवाचा आनंद घेणारा आहेत. विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना चालना देण्यासाठी दरवर्षी महाविद्यालयात या क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले जाते.
विविध क्रीडा स्पर्धा मध्ये प्रथम द्वितीय, तृतीय, सामनावीर, ठरलेल्या यशस्वी खेळाडूंना आकर्षक पारितोषिक पारितोषिके दिले जातात.
या क्रीडा महोत्सवात विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे अशी आवाहन प्र प्राचार्य युवराज महालिंगे, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र मुंबरकर तसेच डॉ.तेजस जयकर, प्रा .आदिती मालपेकर यांनी केले आहे.