Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

लाडकी बहीण योजनेचे पैसे नेमके कधी येणार? रक्षाबंधन की, भाऊबीज? ; अजितदादांच्या वक्तव्यामुळे संभ्रम.

मालेगाव : महायुती सरकारनं अर्थसंकल्प सादर करताना राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरूवात केली. या योजनेची घोषणा झाल्यापासूनच राज्यभरातील महिलांनी योजनेचा अर्ज भरण्यासाठी गर्दी केली होती. अशातच आता राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता खात्यात कधी येणार, याची आतुरता लागली आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येत्या 17 तारखेला राज्यातील महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हफ्ता जमा होणार असल्याचं सांगितलं. तसेच, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे एकत्रच खात्यात जमा होणार आहे, असंदेखील सांगितलं. पण, आज अजित पवारांनी मालेगावात बोलताना लाडकी बहीण योजनेचे पैसे भाऊबीजेला महिलांच्या खात्यात जमा होतील, असं म्हटलं. अजित पवारांच्या वक्तव्यानं काही काळासाठी संभ्रम निर्माण झाला. पण, काही क्षणातच अजित पवारांना जाणीव झाली आणि त्यांनी लगेचच 17 ऑगस्टला महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील, असं सांगितलं.

अजित पवार आज मालेगाव दौऱ्यावर आहेत. मालेगावात बोलताना अजित पवारांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं. अजित पवार म्हणाले की, राज्यांत विधानसभा निवडणूका येणारं आहेत. आपण महायुती म्हणुन सामोरे जाणार आहोत. तत्पूर्वी चांगल्या योजना आपण आणल्या आहेत. गरीब घरात जन्माला आलेल्या मुलींसाठी देखील योजना आणल्या आहेत. महिला सबलीकरण करण्यासाठीं योजना आहेत. महायुती घटक पक्षांनी स्वागत केलं. आपलयाला सर्वांना एकोप्याने निवडणुकांना सामोरे जावं लागणार आहे. त्यामुळें आम्ही एकत्रित दौऱ्ये करणार आहोत. घटक पक्षांच्या सर्वांनी एकत्रित काम करायचं आहे यासाठी आवाहन करणार आहे. युतीचं सरकार आलं पाहिजे त्यासाठी नागरिकांनी देखील पाठिंबा दिला पाहिजे.”

लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी येणार? अजित दादा चुकून काय बोलून गेले? –

“राज्यांत महायुतीच सरकार आलं, तर वीज माफी सह सगळ्या योजना आम्ही चालू ठेऊ. जवळपास काही महिने आणि पुढील 5 वर्ष याचा हिशोब काढला तर 1 लाख रुपये मिळणार आहेत. ही रक्कम कमी नाही. इच्छेला मुरड घालावी लागणार आहे.” पुढे बोलताना अजित दादा चुकून भाऊबीज बोलले, आम्ही 17 तारखेला पैसे देणार आहोत, असं अजित पवार म्हणाले.

लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता 17 ऑगस्टला –

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्टलाच मिळणार असून याबाबत शासन दरबारी निर्णय झाला आहे. विशेष म्हणजे, 17 ऑगस्ट रोजी राज्य सरकारकडून भव्य दिव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून हे पैसे वितरीत केले जाणार आहेत. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. या कार्यक्रमाला एकाच मंचावरती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असणार आहेत. तर, प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्री या कार्यक्रमातून उपस्थित राहतील. 17 ऑगस्टला दोन ते अडीच कोटी महिलांना पहिला हप्ता देण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारचा विचार असल्याचीही माहिती आहे. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयामुळे योजनेसाठी पात्र झालेल्या महिला भगिनींना मोठा दिलासा मिळाला आहे. मालेगाव : महायुती सरकारनं अर्थसंकल्प सादर करताना राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरूवात केली. या योजनेची घोषणा झाल्यापासूनच राज्यभरातील महिलांनी योजनेचा अर्ज भरण्यासाठी गर्दी केली होती. अशातच आता राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता खात्यात कधी येणार, याची आतुरता लागली आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येत्या 17 तारखेला राज्यातील महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हफ्ता जमा होणार असल्याचं सांगितलं. तसेच, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे एकत्रच खात्यात जमा होणार आहे, असंदेखील सांगितलं. पण, आज अजित पवारांनी मालेगावात बोलताना लाडकी बहीण योजनेचे पैसे भाऊबीजेला महिलांच्या खात्यात जमा होतील, असं म्हटलं. अजित पवारांच्या वक्तव्यानं काही काळासाठी संभ्रम निर्माण झाला. पण, काही क्षणातच अजित पवारांना जाणीव झाली आणि त्यांनी लगेचच 17 ऑगस्टला महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील, असं सांगितलं.

अजित पवार आज मालेगाव दौऱ्यावर आहेत. मालेगावात बोलताना अजित पवारांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं. अजित पवार म्हणाले की, राज्यांत विधानसभा निवडणूका येणारं आहेत. आपण महायुती म्हणुन सामोरे जाणार आहोत. तत्पूर्वी चांगल्या योजना आपण आणल्या आहेत. गरीब घरात जन्माला आलेल्या मुलींसाठी देखील योजना आणल्या आहेत. महिला सबलीकरण करण्यासाठीं योजना आहेत. महायुती घटक पक्षांनी स्वागत केलं. आपलयाला सर्वांना एकोप्याने निवडणुकांना सामोरे जावं लागणार आहे. त्यामुळें आम्ही एकत्रित दौऱ्ये करणार आहोत. घटक पक्षांच्या सर्वांनी एकत्रित काम करायचं आहे यासाठी आवाहन करणार आहे. युतीचं सरकार आलं पाहिजे त्यासाठी नागरिकांनी देखील पाठिंबा दिला पाहिजे.”

लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी येणार? अजित दादा चुकून काय बोलून गेले?

“राज्यांत महायुतीच सरकार आलं, तर वीज माफी सह सगळ्या योजना आम्ही चालू ठेऊ. जवळपास काही महिने आणि पुढील 5 वर्ष याचा हिशोब काढला तर 1 लाख रुपये मिळणार आहेत. ही रक्कम कमी नाही. इच्छेला मुरड घालावी लागणार आहे.” पुढे बोलताना अजित दादा चुकून भाऊबीज बोलले, आम्ही 17 तारखेला पैसे देणार आहोत, असं अजित पवार म्हणाले.

लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता 17 ऑगस्टला 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्टलाच मिळणार असून याबाबत शासन दरबारी निर्णय झाला आहे. विशेष म्हणजे, 17 ऑगस्ट रोजी राज्य सरकारकडून भव्य दिव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून हे पैसे वितरीत केले जाणार आहेत. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. या कार्यक्रमाला एकाच मंचावरती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असणार आहेत. तर, प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्री या कार्यक्रमातून उपस्थित राहतील. 17 ऑगस्टला दोन ते अडीच कोटी महिलांना पहिला हप्ता देण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारचा विचार असल्याचीही माहिती आहे. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयामुळे योजनेसाठी पात्र झालेल्या महिला भगिनींना मोठा दिलासा मिळाला आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles