Monday, June 16, 2025

Buy now

spot_img

“चल तुला घरी सोडतो..”, असं सांगितलं, पण त्यानं तिला थेट हॉटेलात नेलं अन् जबरदस्तीनं…..

मुंबई : मुंबई म्हणजे, घड्याळाच्या काट्यावर चालणारं शहर. हे शहर दिवसरात्र नुसतं धावतंच असतं, असं म्हणतात. अनेकांची स्वप्न पूर्ण करणाऱ्या या शहरात सध्या दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. नुकत्याच नागपाड्यात घडलेल्या एका घटनेनं संपूर्ण शहर हादरलं आहे. एका 21 वर्षांच्या तरुणानं आपल्या प्रेयसीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आपल्या प्रेयसीला भुलवून तिच्यावर अत्याचार करणारा आरोपी सोहेल खानच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

आरोपीच्या प्रेयसीनंच दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत बलात्कार, विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. प्रेयसीच्या तक्रारीनुसार, सोहेल खाननं मुलीला कॉलेजमधून काढून टाकण्याचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप आहे. घरी नेतो म्हणून सांगून आरोपीनं तिला भायखळ्यातील एका हॉटेलमध्ये नेत्याचंही तरुणीनं सांगितलं आहे. त्या हॉटेलमध्ये तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचंही तरुणीनं तक्रारीत म्हटलं आहे.

तरुणीनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. दोघांच्याही पालकांनी लग्नाला होकार दिला होता. तसेच, तिनं तक्रारीत म्हटलं आहे की, तिनं वारंवार आक्षेप घेतल्यानंतरही आरोपीनं तिच्यासोबत शारीरिक जवळीक साधण्यासाठी दबाव टाकला. तरुणीच्या कुटुंबीयांनी त्यांना सांगितलं होतं की, त्याचं लवकरच लग्न लावून देऊ.

नेमकं घडलं काय?
मुंबईच्या नागपाड्यात घडलेल्या धक्कादायक घटनेनं संपूर्ण देश हादरला. रिलेशनशिपमध्ये असलेल्या आणि लवकरच विवाहबद्ध होणार असलेल्या एका तरुणीनं आपल्या प्रियकराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. कॉलेजमधून घरी सोडतो असं सांगून प्रियकरानं आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप तरुणीनं केला आहे. कॉलेजमधून घरी सोडतो, असं सांगून त्याऐवजी तरुणानं तिला भायखळ्याच्या हॉटेलमध्ये नेलं आणि तिथे जबरदस्तीनं तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. तरूणीने त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने तिचं काहीचं ऐकलं नाही. त्यानं जबरदस्तीनं तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles