सावंतवाडी : ज्येष्ठ नागरिक विकास मंच, बांदा पंचक्रोशी या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी हनुमंत सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बांदा ग्रामपंचायत सभागृहामध्ये सायंकाळी पार पडली. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नागरिक विकास मंच बांदा या संस्थेचे अध्यक्ष अन्वर खान, ज्येष्ठ मार्गदर्शक व बांदा गावचे माजी सरपंच एस. आर. सावंत, उपाध्यक्षा श्रीमती अनुराधा मोर्ये, सचिव गुरुनाथ नार्वेकर, खजिनदार जगन्नाथ सातोसकर उपस्थित होते.
सचिव गुरुनाथ नार्वेकर यांनी सर्वांचे स्वागत करून सन २०२३- २०२४ या आर्थिक वर्षातील संस्थेच्या अहवालाचे वाचन केले. आर्थिक वर्षातील झालेल्या जमाखर्चाचे विश्लेषण त्यांनी यावेळी केले. यावेळी झालेल्या चर्चेत एम. डी. मोरबाळे, म. गो. सावंत, ज्ञानेश्वर केसरकर, हरिश्चंद्र भिसे, चंद्रकांत मोर्ये, राजू तावडे यांनी भाग घेतला. यावेळी संस्थेच्या मालकीची वास्तु उभारण्यासाठी चर्चा करण्यात आली तर धर्मदाय कार्यालयाकडे संस्थेची नोंदणी करण्यासाठी सचिव गुरुनाथ नार्वेकर यांनी जे परिश्रम घेतले त्याबद्दल त्यांचे, संस्थेचे अध्यक्ष अन्वर खान व सर्व कार्यकारणी सदस्यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.
यावेळी राजू तावडे यांना सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष अन्वर खान व ज्येष्ठ मार्गदर्शक एस. आर. सावंत यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक दयानंद दत्ताराम गवस यांच्याकडून ज्येष्ठ नागरिक विकास मंच संस्थेला ५००० रुपये देणगी देण्यात आली, त्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.
यावेळी अंकुश माजगावकर, प्रमोद अळवणी, प्रकाश पाणदरे, म. गो. सावंत, सुकाजी गावडे, एम. डी. मोरबाळे, हरिश्चंद्र भिसे, चंद्रकांत मोर्ये, अशोक परब,उत्तम देसाई, श्री. गणेश गर्दे, श्रीमती गीता गर्दे, अच्युत पिळणकर, विश्वनाथ विरनोडकर, श्री पिळणकर, संजय नाईक, अशोक नाईक, सौ. अर्चना चंद्रकांत सावंत, श्रीमती महाजन, श्री. वसकर, दादा मोर्ये, श्री. अंकुश माजगावकर, सुखाजी गावडे, श्रीमती सुमित्रा नाडकर्णी, सुभाष नाईक आदी उपस्थित होते.