सावंतवाडी : तालुक्यातील माडखोल व्ही. पी. फार्मसी महाविद्यालयामध्ये रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही रक्तदान महायज्ञाचे आयोजन केले आहे त्या निमित्ताने दिनांक 7/1/2025 रोजी सकाळी ठिक 10 वाजता व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी माडखोल येथे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. आपल्या महाराष्ट्रात सिकलसेल अॅनेमिया,हिमोफिलिया, थॅलेसिमिया, ब्लड कॅन्सर, किडनी फेल्युअर अशा रुग्णांना वारंवार रक्ताची नितांत आवश्यकता असल्याने महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्यांना रक्तबाटल्या देण्याचे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान यांच्या वतीने ठरविले असून त्यासाठी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या सामाजिक कार्यात सहभागी होऊन आम्हास उपकृत करावे अशी विनंती संस्थानच्या वतीने करण्यात आली आहे.
ADVT –



