सावंतवाडी : सावंतवाडी येथे निखिल जाधव व प्रा. सचिन पाटकर यांचा संयुक्त सत्कार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समन्वय समितीमार्फत सावंतवाडीतील गार्डनध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. समन्वय समितीचे अध्यक्ष आयु. केशव जाधव यांनी सर्वांचे स्वागत करुन आयु. निखिल कांता जाधव यांची कृषी सहायक म्हणून शासकीय सेवेत नियुक्ती झाल्याचे तर आयु. सचिन पाटकर यांना राष्ट्रीय शिवसह्याद्री कला साहित्य संमेलन कराड जि.सातारा या संस्थेचा महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार प्राप्त झाल्याचे सांगितले.
त्यानंतर समन्वय समितीचे उपाध्यक्ष आयु.जगदीश चव्हाण आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पत्रकार आयु.मोहन शेर्लेकर यांच्या हस्ते दोन्हीं मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी आयु.कांता जाधव,सचिव आयु.विनायक जाधव,आयु.लाडू जाधव,आयु.कविता निगुडकर ,आयु.अनिल जाधव,आयु.सुनिल जाधव,आयु.सुरेश जाधव,आयु.तिळाजी जाधव,आयु.सावली पाटकर,आयु.चेतन जाधव,आयु.प्राजक्ता जाधव इ.समन्वय समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अध्यक्ष/ सचिव
डाॅ.बाबासाहेब समन्वय समिती सावंतवाडी


