Wednesday, October 29, 2025

Buy now

spot_img

श्रीदेवी माऊली गिरोबा देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती आरोस – दांडेलीच्या अध्यक्षपदी शंकर नाईक यांची फेरनिवड!

सावंतवाडी : श्री.देवी माऊली गिरोबा देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती आरोस दांडेली ता. सावंतवाडी. या देवस्थान कमिटीचा पाच वर्षाचा कार्यकाळ दिनांक 02/07/2024 रोजी संपल्याने पुढील पाच वर्षासाठी नवीन कार्यकारणी निवड करण्यासाठी आरोस ग्रामपंचायतीच्या वतीने आरोस व दांडेली गावातील ग्रामस्थांची विशेष ग्रामसभा सोमवार दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी श्रीदेव गिरोबा मंदिराच्या सभागृहात सरपंच श्री.शंकर विष्णू नाईक यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी आरोस व दांडेली गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामसेवक श्री कुबल यांनी उपस्थितांचे स्वागत करून देवस्थान कमिटी निवड करणे बाबतचे नियम व कार्यप्रणाली सर्वांसमोर मांडली. कमिटीचे सचिव श्री सिद्धेश नाईक यांनी कमिटीचा मागील पाच वर्षांमध्ये झालेला जमा खर्च सभेमध्ये मांडला.
अध्यक्ष श्री शंकर नाईक यांनी श्री. गिरोबा मंदिर जिर्णोद्धाराचे काम हे 70 टक्के पूर्ण झाल्याचे सांगितले.
सदर कमिटीचे हे मागील पाच वर्षाचे काम हे अतिशय चांगले झालेले असून पुढील काळातही सदर ह्याच कमिटीला काम करण्याची संधी द्यावी असे ज्येष्ठ ग्रामस्थ श्री नारायण मोराजकर यांनी सुचविले त्यांना श्री.शरद नाईक यांनी अनुमोदन दिले.
आणि विद्यमान कमिटीच्या फेरनिवडीचा ठराव सभेमध्ये सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

कार्यकारणी पुढील प्रमाणे –
श्री शंकर विष्णू नाईक अध्यक्ष, श्री गजानन जगन्नाथ परब उपाध्यक्ष, श्री सिद्धेश बुधाजी नाईक सचिव, श्री श्रीधर यशवंत नाईक खजिनदार, श्री तानाजी वामन खोत सदस्य, श्री शांताराम भिवा नाईक सदस्य, श्री प्रसाद जयराम नाईक सदस्य, श्री गुरुनाथ साबाजी नाईक सदस्य, श्री सत्यवान प्रभाकर नाईक सदस्य, श्री बाळाजी रामचंद्र अभ्यंकर सदस्य, श्री शांताराम नवसो आरोलकर सदस्य, श्री आनंद शशिकांत नार्वेकर सदस्य, श्री प्रकाश विठ्ठल नाईक सदस्य, श्री विश्वास अंकुश मोरजकर सदस्य, श्री गुरुनाथ बोंबडो आरोसकर सदस्य.
यावेळी आरोस दांडेली गावातील ग्रामस्थ , सरपंच ,उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, देवस्थान मानकरी उपस्थित होते.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles