Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सावंतवाडीतील जुन्या शिवसैनिकांकडून बाळासाहेबांच्या कल्पवृक्षरूपी स्मारकाला अभिवादन.!

सावंतवाडी : हिंदुहृदयसम्राट, शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जुन्या शिवसैनिकांकडून बाळासाहेबांच्या जीवंत स्मारकाला अभिवादन करण्यात आले. कल्पवृक्षरूपी या स्मारकाला माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पुष्पहार अर्पण केला. तसेच नळपाणी योजनेच्या कामात जुन्या स्मारकाची जागा जाणार असल्याने शेजारी स्मारकरुपी पाच कल्पवृक्षांचे रोपण नव्यानं करण्यात आले.

स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जुने शिवसैनिक, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासह जुन्या शिवसैनिकांकडून पाळणेकोंड धरण येथील जिवंत स्मारकाला अभिवादन करण्यात आले. जयंतीनिमित्त लावलेल्या पाच कल्पवृक्षाच्या ठिकाणी जाऊन त्या पुष्पहार अर्पण करून बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले. तसेच नळपाणी योजनेच्या कामात जुन्या स्मारकाची जागा जाणार असल्याने शेजारी स्मारकरुपी पाच कल्पवृक्षांच रोपण नव्यानं करण्यात आले असून जुन्या स्मारकाची रोपही अन्यत्र लावली जाणार आहेत. आजच्या दिवसाच औचित्य साधून नव्या पाच कल्पवृक्षांच रोपण जुन्या शिवसैनिकांकडून करण्यात आले‌. यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, उमेश कोरगावकर, उमाकांत वारंग, विलास जाधव, सुरेश भोगटे, गणपत बांदेकर, दीपक सावंत, रत्नाकर माळी, बंड्या तोरसेकर, प्रसाद कुडतरकर, महेश नार्वेकर, संदीप नाईक तसेच पाणी पुरवठा अधिकारी भाऊ भिसे, उद्यान पर्यवेक्षक गजानन परब आदी उपस्थित होते.

यावेळी श्री‌. साळगावकर म्हणाले, २०१७ मध्ये सतरा नगरसेवक आणि मी हे जीवंत स्मारक उभारले होते. गावागावात संघटना पोहचवून सामान्य माणसाच्या हाती नेतृत्व देण्याची किमया ही स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी त्याकाळी केली. म्हणूनच अनेक नेते आज राज्याला मिळाले. प्रस्थापितांऐवजी सर्वसामान्य लोकांना नेतृत्व करण्याची संधी बाळासाहेबांमुळे मिळाली. देवळात घंटा बडवणार हिंदुत्वव नको असं सांगण्याची हिंमत त्यांच्यात होती. अब्दुल कलामांच कौतुक करणारे कोणत्याही धर्माचा द्वेष न करणारे ते व्यक्तिमत्त्व होत. शाबिर शेख यांच्यासारखे मुस्लिम कार्यकर्ते शिवसेनेत होते. आतंकवादी, दहशतवाद्यांवर त्यांनी प्रहार केला. हे हिंदूत्व बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलं. त्यांचा मला अभिमान आहे असे उद्गार याप्रसंगी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी काढले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles