सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘या’ चार ठिकाणच्या नद्यांमधील गाळ काढण्याचे काम १ फेब्रुवारीपासून! ; दोन कोटी निधी उपलब्ध, आणखी अडीच कोटी निधी उपलब्ध करून देणार! – पालकमंत्री नितेश राणे यांची ग्वाही.

सिंधुदुर्गनगरी : गाळ काढण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ, मात्र पुढच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूर परिस्थिती नकोय ! जास्त पाऊस झाला तर ज्या ठिकाणी गाळ आहे तो काढा व जिल्ह्यातील जनतेला दिलासा द्या. असे आदेश शुक्रवारी झालेल्या बैठकीत पालकमंत्री तथा मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना दिले. दोन कोटी निधी जिल्हा नियोजन विभागाकडे उपलब्ध आहे.आणखी अडीच कोटी निधी उपलब्ध करून देतो, अशी ग्वाही त्यांनी दिली.

दोन कोटी निधीतून पहिल्या टप्प्यात कणकवली मधील जाणवली नदी उर्सुला हायस्कूल, तेरखोल नदी बांदा, आंबेडकर नगर कुडाळ व ख्रिश्चन वाडी पीठ ढवळ नदी या चार ठिकाणची कामे १ फेब्रुवारीपासून सुरू करण्याचे मंत्री नितेश राणे यांनी दिले आदेश.
या वर्षी सिंधुदुर्गात पुर परिस्थीती नकोय, जिल्हात गेल्या तिन वर्षात पूर आलेल्या गावांचा अभ्यास करुन पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यानी पूर परिस्थितीची ठिकाणे निश्चित केली. उपलब्ध २ कोटीतून पहिली चार कामे हाती घेतली. एकुण ९ कामे पूर्ण करणार.आणखी अडीज कोटी निधी आणखी उपलब्ध करून एकुण साडेचार कोटी निधी उपलब्ध करुन देणार असेही या वेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
केवळ शासकीय पैशातून गाळ काढून जिल्ह्यातील पूर परिस्थिती थांबविता येणार नाही. अनेक नद्या गाळाने भरलेल्या आहेत. अनेक निवेदने माझ्याकडे प्राप्त झाली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील विकास कामांसाठी किंवा रस्त्याच्या कामांसाठी त्या त्या ठेकेदारांमार्फत हे गाव उपसण्याचे काम झाले तर गाळमुक्त नद्या होतील व विकास कामांना ही गती मिळेल याबाबतची चर्चा या बैठकीत झाली. व त्यानुसार जिल्ह्यातील विकास कामे करणाऱ्या ठेकेदारांना विश्वासात घेऊन त्यांच्या मशिनरीचा वापर करून घ्यावा असे निर्देशही पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles