Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कर्तृत्व बजावलेल्या व्यक्तींचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सन्मान!

सिंधुदुर्गनगरी : प्रजासत्ताक दिनाचा  मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पोलिस परेड ग्राऊंड, सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय, सिंधुदुर्ग येथे पार पडला. यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम केलेल्या व्यक्तींचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते  सन्मान करण्यात आला.
उल्लेखनीय सेवेबद्दल अपर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांना ‘केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक, अन्वेषण’ प्राप्त झाले. त्यांच्या या उल्लेखनीय सेवेबद्दल पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.
सन 2023 मध्ये पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्राप्त झालेल्या  अधिकारी व अंमलदार यांचा देखील यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यामध्ये पोलीस मुख्यालय येथील राखीव पोलीस निरीक्षक रामदास नागेश पालशेतकर, वेंगुर्ला पोलीस ठाणे येथील पोलीस निरक्षक संदीप अशोक भोसले, चिपी विमातळ येथील पोलीस उप निरीक्षक प्रताप विठोबा नाईक, जिल्हा विशेष शाखा मनोज मारुती मांजरेकर, पोलीस मुख्यालय येथील पोलीस हवालदार विश्वजीत झीलू परब,  निवती पोलीस ठाणे येथील श्रीमती अर्चना गोविंद कुडाळकर, स्थानिक गुन्हा शाखा सिंधुदुर्ग येथील पोलीस हवालदार प्रकाश सहदेव कदम, पोलीस मुख्यालय येथील पोलीस हवालदार  संजय ज्ञानोबा साळवी,स्थागुअशा, सिंधुदुर्ग येथील पोलीस हवालदार डॉमनिक संतान डिसोजा, वैभववाडी पोलीस ठाणे येथील पोलीस शिपाई राहुल भगवान तळसकर यांचा समावेश आहे.
  जिल्हा कृषि विभागामार्फत उत्तम सुर्यकांत फोंडेकर यांना  जिल्हा कृषि पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान व नियोजनबध्द व्यवस्थापनाव्दारे आंबा उत्पादनामध्ये हापूस आंबा प्रथम पेटी पाठवण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. तसेच  अनंत दिगंबर प्रभु आजगावकर यांनी आधुनिक तंत्रज्ञान व नियोजनबध्द व्यवस्थापनाव्दारे लाल भेंडी 17 फूट 10 इंच उंच एवढे विकसीत केल्याने वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली त्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles