बांदा : शिवजयंतीचे औचित्य साधून श्री स्वराज्य प्रतिष्ठान बांदा यांच्यावतीने शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये चित्रकला, रंगभरण स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, पोवाडा स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा अशा विविध स्पर्धा ठेवण्यात आल्या आहेत. चित्रकला स्पर्धा ९ फेब्रुवारी, १५ फेब्रुवारी रोजी वक्तृत्व स्पर्धा, १६ फेब्रुवारी रोजी पोवाडा व शिवगीत गायन स्पर्धा तर १९ फेब्रुवारी रोजी वेशभूषा स्पर्धा होणार आहेत.


