सावंतवाडी : सावंतवाडी मतदार संघातील सावंतवाडी पोलीस ठाणे परिसरात सावंतवाडी पोलीस ठाणे व विभागीय पोलीस ठाणे या दोन नवीन इमारती बांधल्या आहेत. सदर दोन्ही इमारतींच्या समोरील रस्ता खराब झालेला आहे. मुख्य रस्त्यापासून (जुना मुंबई-गोवा रस्ता) या दोन्ही इमारतींपर्यंत रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात यावे, तसेच रात्रीच्या वेळी पुरेशी स्ट्रिट लाईटची सोय उपलब्ध करुन देण्यात यावी आणि या दोन्ही इमारतीच्या समोर सुशोभीकरण करण्यात यावे.
तसेच पोलीस परेड ग्राऊंडपर्यंत जाणारा रस्ता खराब झालेला आहे. त्याचे डांबरीकरण करण्यात यावे. पोलीस परेड ग्राऊंडवर मंत्रीमहोदय व महनीय व्यक्ती यांची हेलिकोप्टर उतरत असल्याने सदर रस्त्याचे डांबरीकरण करावे व स्ट्रिटलाईटची सोय करण्यात यावी.
वरील दोन्ही कामांकरिता माजी मंत्री केसरकर यांच्या माध्यमातून विकास निधी मंजूर करावा व सार्वजनिक बांधकाम विभाग, सावंतवाडी यांचेकडून सदर दोन्ही कामे पूर्ण करणेबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी विनंती निवेदनाद्वारे सावंतवाडी नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते गोविंद बाळा वाडकर यांनी माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांना केली आहे.


