सावंतवाडी : येथे चुकीच्या पद्धतीने ग्रीट मारल्याने सतत अपघात होत आहेत. मागच्या चार दिवसांत अपघाताच सत्र थांबत नसून आज परिचारिकेला अपघातास सामोरे जावे लागले, मोहीनी जाधव असं त्यांचं नाव आहे. यात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तीला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रशासक असणारे प्रांताधिकारी हेमंत निकम आणि मुख्याधिकारी सागर साळुंखे ठेकेदाराला पाठीशी का घालत आहे.? दुर्घटनांकडे ते का दुर्लक्ष करत आहेत? की डांबरात ‘धुळधाण’ उडवली आहे, असे संतप्त सावंतवाडीकर नागरिक सवाल उपस्थित करित आहेत.