Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

चिमुकल्यांना मंत्री नितेश राणे यांनी घडविले हेलिकॉप्टर दर्शन.! ; पालकमंत्री राणे यांनी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आणला गोडवा!

गावातील विद्यार्थ्यांनी मंत्री नितेश राणे यांचे केले स्वागत .!

वैभववाडी : राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नाधवडे येथे हेलिकॉप्टरने उतरणार हे कळतात अबालवृद्धांची उत्सुकता वाढली. त्यातच शाळकरी मुलांना हेलिकॉप्टर कसे असते, ते कसे उतरते हे पाहण्याची आणखीनच उत्सुकता होती. त्यात आमदार म्हणून वैभववाडीत भेटणारे नितेश राणे राज्याचे कॅबिनेट मंत्री झाले आणि आता ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून वैभववाडीत हेलिकॉप्टरने येणार म्हणून त्यांच्या स्वागतासाठी गावकरी आणि शाळकरी मुलांमध्ये तर मोठाच उत्साह पाहायला मिळाला. हेलिकॉप्टर उतरल्यानंतर मंत्री नितेश राणे यांचे स्थानिक पदाधिकारीऱ्यानी स्वागत केलेच त्याच प्रमाणे शाळकरी मुलांनीही त्यांचे स्वागत केले.या मुलांनची मंत्री नितेश राणे यांनी विचारपूस करत प्रत्येक मुलाच्या हातावर चॉकलेट दिले आणि विद्यार्थ्यांच्या या आनंदाला आणखीनच गोडवा आनला.
पालकमंत्री नाम. नितेश राणे यांचे व्यापारी मेळावा निमित्त नाधवडे येथे हॅलीकाॅप्टरने आगमन झाले. पालकमंत्री झाल्यानंतर पहील्यांदाच मंत्री नितेश राणे यांचे आगमन होताच वैभववाडी वासियांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. नाधवडे गावात पहिल्यांदाच हेलिकॉप्टर उतरणार याची उत्सुकता गेली दोन दिवस सर्वांना लागली होती. नाधवडे येथील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी ही मंत्री नितेश राणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सर्व बालचमुंची मंत्री नितेश राणे यांनी विचारपूस करत त्यांना चाॅकलेट दिले. हेलिकॉप्टर विद्यार्थ्यांनी जवळून पाहिले. उपस्थित शिक्षकांनी याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली.


यावेळी वैभववाडी भाजपा अध्यक्ष सुधीर नकाशे, शाळेचे मुख्याध्यापक संजय पाताडे, माजी उपसभापती बंड्या मांजरेकर, माजी सभापती बाप्पी मांजरेकर, परशुराम इस्वलकर, शेट्ये मॅडम, सरपंच लीना पांचाळ, उपसरपंच प्रफुल कोकाटे, माजी सरपंच शैलजा पांचाळ व गावातील ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles