कुडाळ : येथे सिंधुदुर्ग पोलिसांच्या वतीने ज्येष्ठ नागरिक मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाईनचे लोकार्पण केले.

तसेच यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा हा आमचं कुटुंब आहे. या कुटुंबातील प्रत्येकाची सुरक्षा आणि त्यांना विश्वास देण्याची जबाबदारी आमच्याबरोबरच प्रशासनाची आहे. त्यामध्ये कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. तसेच अंमली पदार्थ व अनैतिक धंद्यांवर कारवाई करावी, अशा सूचना त्यांनी पोलीस प्रशासनाला केली. तसेच पोलीस विभागाचे कौतुकही त्यांनी केले. यावेळी आमदार तथा माजी मंत्री दीपक केसरकर, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे, पद्मश्री परशुराम गंगावणे, पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर अधीक्षक कृषिकेश रावले, ज्येष्ठ लेखिका वृंदा कांबळी, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष भालचंद्र मराठे आदी उपस्थित होते.


