Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

मोठा ट्विस्ट – ममता कुलकर्णी पुन्हा बनली महामंडलेश्वर! ; पहिल्यांदाच उघड केलं पद सोडण्याचं कारण.

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने संन्यास घेतला. अध्यात्माच्या मार्गाला लागलेली ममता महामंडलेश्वर झाली. पण तिला महामंडलेश्वर पद दिल्याने किन्नर आखाड्यात वाद झाला आणि त्या वादातून तिने हे पद सोडलं. मात्र आता पुन्हा नवा ट्विस्ट आला आहे. ममताने पुन्हा एकदा महामंडलेश्वर पद स्वीकारलं आहे. ममताने एक व्हिडीओ जारी करून त्यात ही माहिती दिली आहे. ममताने 1 मिनिट 14 सेकंदाचा व्हिडीओ जारी केला आहे. त्यात तिने ही माहिती दिली आहे. तसेच महामंडलेश्वर पद सोडण्याचं नेमकं कारणही तिने पहिल्यांदाच उघड केलं आहे.

गुरू काय म्हणाल्या?

किन्नर आखाड्याच्या पाठीधीश आचार्य महामंडलेश्वर स्वामी डॉक्टर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. यमाई ममता नंद गिरी ही किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनलीय आणि ती कायम महामंडलेश्वर राहील. तिने भावनेच्या भरात पदाचा राजीनामा दिला होता. पण आम्ही तो स्वीकारला नाही, असं त्रिपाठी यांनी सांगितलं. त्यानंतर ममतानेही आपण महामंडलेश्वर पद पुन्हा स्वीकारल्याचा व्हिडीओ जारी करून आपल्या गुरुच्या म्हणण्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.

अवघ्या 15 दिवसात…

ममता कुलकर्णीने 24 जानेवारी रोजी किन्नर आखाड्याचं महामंडलेश्वर पद स्वीकारलं होतं. तिचा पट्टाभिषेकही करण्यात आला होता. 10 फेब्रुवारी रोजी ममताने एक व्हिडीओ जारी करून महामंडलेश्वर पद सोडल्याचं सांगितलं. तसेच किन्नर आखाड्याशी आपला काहीच संबंध राहणार नसल्याचंही जाहीर केलं होतं.

ममता काय म्हणाली होती?

ममता कुलकर्णीने 10 फेब्रुवारी रोजी किन्नर आखाड्याचं महामंडलेश्वर पद सोडलं होतं. त्यावेळी तिने व्हिडीओतून संवाद साधला होता. मी महामंडलेश्वर यामाई ममता नंद गिरी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. माझ्यामुळे किन्नर आखाड्यात वाद सुरू झाले आहेत. मी 25 वर्षापासून साध्वी होते आणि कायम साध्वी राहणार आहे. मला महामंडलेश्वराचा सन्मान देण्यात आला. पण काही लोकांना ते खटकलं. मग ते शंकराचार्य असो की आणखी कोणी. मी तर बॉलिवूडला 25 वर्षापूर्वीच सोडलं होतं, असं ममताने म्हटलं होतं.

मेक अप आणि बॉलिवूडपासून एवढं लांब कोण राहतं? मी 25 वर्ष तपस्या केली आहे. मी स्वत: गायब होते. मी काय करते? असं लोक नेहमी म्हणतात. नारायण तर सर्व संपन्न आहेत. ते तर विविध प्रकारचे आभूषण घालून महायोगी आहेत. देव आहेत. तुम्ही कोणत्याही देवी देवतांचे फोटो पाहा. त्यांचा श्रृंगार काही कमी आहे का? माझ्यासमोरही सर्वजण याच श्रृंगारात आले होते, असंही तिने म्हटलं होतं.

ADVT –

सोने तारण कर्ज योजना.! – सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग, यांची अभिनव योजना.

 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles